Video | ‘जेव्हा मी काडीपैलवान होते आणि नाचण्याचा प्रयत्न करायचे…’, प्राजक्ता माळीने शेअर केला बालपणीचा व्हिडीओ!

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर आपले हटके लूक शेअर करत, ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Video | ‘जेव्हा मी काडीपैलवान होते आणि नाचण्याचा प्रयत्न करायचे...’, प्राजक्ता माळीने शेअर केला बालपणीचा व्हिडीओ!
प्राजक्ता माळी
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 12:38 PM

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर आपले हटके लूक शेअर करत, ती नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. यावेळी प्राजक्ता माळीने एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तिच्या ‘बाल लीला’ पाहायला मिळत आहे. प्राजक्ता माळीने हा व्हिडीओ शेअर करत तिच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत (Actress Prajakta Mali shares childhood dancing video on social media).

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ‘देवदास’ या चित्रपटातील ‘डोला रे डोला’ या गाण्यावर ती नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ तिच्या बालपणीचा आहे. व्हिडीओ धुरकट दिसत असला तरी प्राजक्ताच्या आठवणी मात्र ताज्या आहेत. प्राजक्ताला बालपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती. ‘जेव्हा मी काडीपैलवान होते आणि CD बघून ditto नाचायचा प्रयत्न करायचे…’, असे मजेशीर कॅप्शनही तिने या व्हिडीओला दिले आहे.

पाहा प्राजक्ताचा खास व्हिडीओ

 (Actress Prajakta Mali shares childhood dancing video on social media)

प्राजक्ताच्या लग्नाची चर्चा

काही महिन्यांपूर्वी परदेशवारीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर प्राजक्ताच्या लग्नाची चर्चासुरु होती. परंतु, तिने तेव्हा इतक्यात लग्नाचा विचार नसल्याचे म्हटले होते. परंतु, नंतर तिने लग्नासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. ‘तशी लग्नाची तयारी सुरू आहे; पण नवरदेव भेटणं अद्याप बाकी आहे’,असे प्राजक्ता म्हणाली होती. ‘लेकीच्या लग्नासाठी आईनं सोनं खरेदी वगैरे केव्हाच सुरू केली आहे. नवरा मुलगा मिळाला, की लग्न करेनच. मात्र, केव्हा हे माहीत नाही. निर्व्यसनी मुलगा असावा ही पहिली अपेक्षा आहे,’ असे तिने एका मुलाखती दरम्यान म्हटले होते.

चित्रपटांना प्राधान्य देणार!

लॉकडाऊनमध्ये प्राजक्ताने स्वतःचे यु-ट्यूब चॅनेल सुरू केले आहे. सोशल मीडियाबाबत ती अनेक गोष्टी नव्याने शिकली. आगामी काळात चित्रपट हे प्राधान्य असेल, असे ती सांगते. ती म्हणाली, ‘हास्यजत्रेत दिसत राहेन. ट्रॅव्हल शो केला आहेच. आता दोन चित्रपट प्रदर्शित व्हायचे आहेत. त्यानंतर संधी पाहून निर्णय घेणार आहे. मला पहिल्यापासूनच घोळक्यात राहायला आवडत नाही. कुठल्याही गोष्टीत म्होरक्या असणं हे माझ्या आवडीचं आहे.’ तर, वेब सीरीजबद्दल अद्याप काही विचार केला नाही असे, प्राजक्ता म्हणाली. तसेच, एका वेब सीरीजची ऑफर आली होती. मात्र, त्यातील काही अनावश्यक दृश्यांमुळे ती नाकारल्याचे प्राजक्ता सांगते.

(Actress Prajakta Mali shares childhood dancing video on social media)

हेही वाचा :

RRR | आलियाच्या ‘सीता लूकची पहिली झलक, चाहते आता आणखी उत्सुक!

वडिलांना आवाज आवडायचा नाही, रिक्षाही चालवली; आनंद शिंदेंचे किस्से वाचाच!

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.