Video | शूटिंगवर असलेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला भाजायला लागले सुके बोंबील, पाहा काय म्हणाली…

सेटवर धमाल मस्ती करत शूट करणाऱ्या स्पृहाने चक्क स्वयंपाक घराचा ताबा घेत, खमंग पदार्थ तयार करण्याकडे आपला मोर्चा वळवला होता. तिने हा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे.

Video | शूटिंगवर असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला भाजायला लागले सुके बोंबील, पाहा काय म्हणाली...
स्पृहा जोशी
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 3:37 PM

मुंबई : आपल्या कविता आणि अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी (Actress Spruha Joshi). अनेक मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून स्पृहाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. नुकताच स्पृहाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. स्पृहाचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये स्पृहा चक्क सुके बोंबील भाजताना दिसत आहे (Actress Spruha Joshi share fish frying video from set).

सेटवर धमाल मस्ती करत शूट करणाऱ्या स्पृहाने चक्क स्वयंपाक घराचा ताबा घेत, खमंग पदार्थ तयार करण्याकडे आपला मोर्चा वळवला होता. तिने हा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे.

पाहा स्पृहाची व्हिडीओ पोस्ट :

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

‘Cooking for co-actors on the outdoor schedule continues.. Sharing the kitchen with this beautiful lady.. and most of all Sharing the joy and laughter.. It’s priceless.. अलिबागला शूट करत असताना सुके बोंबील सीनसाठी म्हणून आले होते. आम्ही शूट संपल्यावर त्यांचा फडशा पाडला ??

माझ्या लहानपणी मी, आई, आणि क्षिप्रा दुपारी भूक लागली की असेच गॅस वर भाजून, तिखट, मीठ, लिंबू लावून बोंबील खायचो. आमच्या तिघींचं ते खास सिक्रेट होतं. आज कित्येक वर्षानी पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. ?’, अशी खास पोस्ट देखील तिने या व्हिडीओसोबत लिहिली आहे (Actress Spruha Joshi share fish frying video from set).

काय करतेय स्पृहा?

हा व्हिडीओ स्पृहाच्या चित्रिकरणाच्या सेटवरचा आहे. स्पृहा जोशी सध्या अलिबागमध्ये तिच्या आगामी प्रोजेक्टचे चित्रीकरण करत आहे. चित्रिकरणादरम्यान कदाचित तिला थोडासा फावला वेळ मिळाला असावा, त्यात नेमका बोंबील भाजायचाच सीन होता. मग काय शूट संपल्यावर तिने सरळ आपला मोर्चा थेट सेटवरच्या स्वयंपाकघराकडे वळवला. तिथे स्वयंपाक करणाऱ्या ताईंना तिने मदतची हात लावला. शूटिंगसाठी आणलेले बोंबील तिने स्वतःच भाजायला घेतेले आणि सगळ्या सहकलाकारांबरोबर त्याचा फडशा पाडला.

सेंद्रिय शेतीमध्ये रमलेली स्पृहा!

नुकतीच स्पृहाने नाशिकमधील अमोल गोऱ्हे आणि संजय पवार या दोन प्रयोगशील शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून शेतमालाच्या पिकण्यापासून ते विकण्यापर्यंतची प्रक्रिया जाणून घेतली. ज्यात सेंद्रिय शेतीची गरज का आहे? त्यातून शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होणार? हे सुद्धा स्पृहाने जाणून घेतले आहे. दरम्यान, स्पृहाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे तर, ती लवकरच ‘सूर नवा ध्यास नवा’च्या महिला विशेष पर्वातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(Actress Spruha Joshi share fish frying video from set)

हेही वाचा :

Video | अली गोनीशी लग्न करण्याबाबत जास्मीन भसीनचा मोठा निर्णय, ऐकून चाहतेही झाले निराश!

PHOTO | वामिकाच्या जन्मानंतर पुन्हा सेटवर परतली अनुष्का शर्मा, ‘कूल लूक’ पाहून चाहतेही उत्सुक!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.