‘कोरोनापेक्षाही भयंकर कीड म्हणजे राजकारण’, अभिनेत्री तेजस्विनी पंडित संतापली!

देशभरात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मात्र, यावेळेस कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा देखील अधिक विध्वंसक असल्याचे सिद्ध झाले आहे. दररोज लाखो लोक या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत, तर कित्येक हजार लोक या विषाणूमुळे बळी पडत आहेत.

‘कोरोनापेक्षाही भयंकर कीड म्हणजे राजकारण’, अभिनेत्री तेजस्विनी पंडित संतापली!
तेजस्विनी पंडित
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 4:05 PM

मुंबई : देशभरात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मात्र, यावेळेस कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा देखील अधिक विध्वंसक असल्याचे सिद्ध झाले आहे. दररोज लाखो लोक या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत, तर कित्येक हजार लोक या विषाणूमुळे बळी पडत आहेत. देशात एकीकडे ही विदारक परिस्थिती असताना दुसरीकडे राजकारणही तापलेलं पाहायला मिळतंय. सामान्य माणूसच नव्हे तर, आता कलाकार देखील या राजकारणावर संताप व्यक्त करू लागले आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारी अभिनेत्री (Tejaswini Pandit) तेजस्विनी पंडित हिने देखील आपला संताप व्यक्त केला आहे (Actress Tejaswini Pandit get angry on politics over corona situation).

कोरोना काळात आरोग्य सेवेसोबतच देशावर आर्थिक समस्येचे मोठे संकट देखील कोसळले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही राजकीय नेते केवळ राजकारण करण्यात व्यस्त असलेले दिसतायत. त्यामुळे अशा नेत्यांवर आणि त्यांच्या राजकारणावर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने संताप व्यक्त करत, राजकारण ही कोरोनापेक्षा भयानक कीड देशाला पोखरते आहे, अशी टीका देखील केली आहे.

काय म्हणाली तेजस्विनी?

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तेजस्विनीने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे सद्य परिस्थितीवर भाष्य केले आहे. यात तिने केवळ देशातच नव्हे, तर जगभरात सुरु असलेल्या राजकारणावर सडकून टीका केली. या स्टोरी पोस्टमध्ये तेजस्विनी लिहिते, ‘सगळ्यात मोठी “कीड” जर आपल्या देशाला, आपल्याच नाही, तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे “राजकारण”… “ही कीड” covidपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. “या कीड”पासून बचाव करता आला तर बघा!!.. अवघड आहे सगळंच…काळजी घ्या”. सध्या तिची ही स्टोरी आणि तिचा हा बेधडक अंदाज चांगलाच चर्चेत आला आहे (Actress Tejaswini Pandit get angry on politics over corona situation).

पाहा पोस्ट :

देशभरात कोरोनाची भयाण परिस्थिती!

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 2,73,810 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,619 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा दीड कोटींच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला बडे अधिकारी आणि मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आता मोदी सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

(Actress Tejaswini Pandit get angry on politics over corona situation)

हेही वाचा :

Sonu Nigam | ‘हिंदू असल्याने म्हणू शकतो, यावेळी कुंभमेळा व्हायला नको होता’, कोरोनाच्या विस्फोटानंतर सोनू निगम संतापला!

धार्मिक तेढ निर्माण करत आल्याचा आरोप, ‘त्या’ ट्विटनंतर अभिनेते मनोज जोशींवर संतापले नेटकरी!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.