अशोक सराफ यांचा ‘लाईफलाईन’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज; चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

Ashok Saraf New Movie Lifeline Teaser : प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा टीझर नुकतंच रिलीज झाला आहे. या टीझरमधून सिनेमाची झलक पाहायला मिळत आहे. तुम्ही हा टीझर पाहिलात का? या सिनेमाबाबत वाचा...

अशोक सराफ यांचा 'लाईफलाईन' सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज; चित्रपटाचा टीझर पाहिलात का?
अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 8:07 PM

मराठी सुपरस्टार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘लाईफलाईन’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘लाईफलाईन’ चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लाईफलाईन’ चित्रपटाचा टिझर नुकताच सोशल मीडियावर झळकला आहे. या टीझरला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे. चित्रपटाच्या या टिझरने सिनेमाबाबतची उत्सुकता अधिकच वाढवली आहे.

सिनेमाची गोष्ट काय आहे?

आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांच्यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही चुरस रंगणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. त्यात आता या टिझरने ही उत्सुकता अधिकच वाढवली आहे. अशोक सराफ आणि माधयव अभ्यंकर यांच्यातील ही वैचारिक जुगलबंदी कोणत्या कारणासाठी आहे, पाहाण्यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

सिनेमात कोण-कोणते कलाकार?

क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर यांच्यासह हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायली आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट ‘लाईफलाईन’चे निर्माते आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांनी या सिनेमाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. आता या जुगलबंदीत कोण जिंकणार, हे चित्रपट पाहूनच कळेल. अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांसारखे दिग्गज या चित्रपटाला लाभले आहेत. त्यांनी हा विषय आपल्या जबरदस्त अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. ‘लाईफलाईन’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून मराठी सिने-सृष्टीतील दर्जेदार चित्रपटांच्या यादीत ओळखला जाईल याची मला खात्री आहे, असं साहिल शिरवईकर यांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.