गायक आनंद शिंदे यांच्या उपस्थितीत ‘143’ चित्रपटातील गाण्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग पूर्ण, चित्रपटात रंगणार गाण्यांची मैफिल
गायक आनंद शिंदे यांच्या उपस्थितीत 'डाउन स्टुडिओ' पुणे, आणि सांताक्रूझ येथील 'अदिवासन रेकॉर्डिंग स्टुडिओ' येथे चित्रपटातील गाण्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले. (Audio recording of songs from '143' completed in the presence of singer Anand Shinde)
मुंबई : प्रेमाची आगळीवेगळी लव्हेबल केमिस्ट्री घेऊन ‘143 (I Love You)’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे. या चित्रपटाच्या ‘आपलं काळीज हाय’ या टॅगलाईनने तर सोशल मीडियावर धुमाकूळच घातला होता. आता या चित्रपटातील दमदार गाणी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास रेकॉर्ड करण्यात आली आहेत. नुकतंच या चित्रपटाच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले. ‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’ तर्फे आणि ‘विरकुमार शहा’ निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक योगेश भोसले यांनी केले आहे. प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या या चित्रपटाचे संगीत संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबद्ध केले आहे. नुकतंच या चित्रपटाच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग पूर्ण करण्यात आले.
गायिका आर्या आंबेकरच्या आवाजात स्वरबद्ध
गायक आनंद शिंदे यांच्या उपस्थितीत ‘डाउन स्टुडिओ’ पुणे, आणि सांताक्रूझ येथील ‘अदिवासन रेकॉर्डिंग स्टुडिओ’ येथे चित्रपटातील गाण्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले. प्रेमाची केमिस्ट्री दाखवणारे या चित्रपटातील लव सॉंग आपली लाडकी गायिका आर्या आंबेकरच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे. तर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी या चित्रपटातील बर्थडे पार्टी सॉंगला त्यांचा स्वरसाज चढवला आहे. याशिवाय गायिका रेश्मा सोनावणे यांनी देखील चित्रपटातील गाण्यांना आपल्या सुमधुर आवाजाची साथ दिली आहे. तसेच पार्श्वगायक प्रमोद त्रिपाठी यांनी ‘143’ चित्रपटात एक कव्वाली गायली आहे.
लवकरच प्रेमाचे लव्हेबल फंडे घेऊन ‘143’ हा चित्रपट आणि चित्रपटातील दमदार गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास सज्ज झाली आहेत. या चित्रपटातील दमदार गाणी प्रेक्षकांना थिरकायला लावणार की नाही हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.
कोरोनाच्या काळात चित्रपटगृहांनाही पूर्णविराम मिळाला असून रसिक प्रेक्षकांच्या नजरा मनोरंजनाकरिता चित्रपटगृहाकडे वळल्या आहेत यातच प्रेमाचे लव्हेबल फंडे घेऊन चित्रपटगृह सुरू होताच ‘143..हे आपलं काळीज हाय’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे. चित्रपटाचं पोस्टर पाहता प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर कधी येईल याकडे साऱ्या सिनेरसिकांचे लक्ष लागून राहिलं आहे.
संबंधित बातम्या
Ananya Panday | आर्यन-अनन्याच्या संभाषणाची सखोल चौकशी होणार, अनन्या पांडे पुन्हा NCBला सामोरी जाणार!