AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झापुक झुपूक… गुलीगत सूरज चव्हाणची सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; दिसणार मराठी सिनेमात

Reelstar Suraj Chavan in Marathi Movie : 'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाण आता मराठी सिनेमात झळकणार आहे. लवकरच त्याचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बिग बॉसमधील त्याचा वावर प्रेक्षकांना आवडतो आहे. त्याचा साधेपणा लोकांना प्रभावित करतोय.अशात त्याचा सिनेमा येणार आहे. वाचा...

झापुक झुपूक... गुलीगत सूरज चव्हाणची सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री; दिसणार मराठी सिनेमात
सूरज चव्हाणImage Credit source: tv9
| Updated on: Aug 25, 2024 | 8:58 AM
Share

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने सर्वत्र धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात एका स्पर्धकाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारा हा स्पर्धक म्हणजेच टिक टॉक स्टार सूरज चव्हाण. सूरजने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकत त्यांच्यावर राज्य केलं. ‘बिग बॉस’च्या घरात सूरजचा खेळ पाहून सर्वत्र त्याचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. खेळ समजला नसला तरी माणुसकी जपत, सगळ्यांची मन जपत आणि तोडीस तोड उत्तर देत सूरज स्वतःला ‘बिग बॉस’च्या घरात सिद्ध करताना दिसतोय. आता सूरज मराठी सिनेमात झळकणार आहे.

सूरजची सिनेसृष्टीत दमदार एन्ट्री

छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सूरजने झगमगाटीच्या दुनियेत स्वतःचं असं स्थान स्वतः मिळवलं. सध्या ‘बिग बॉस मराठी’ मुळे सूरज चव्हाण चांगलाच चर्चेत आलेला पाहायला मिळतोय. रिऍलिटी शोद्वारे सूरज जरी आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी तो आता मोठ्या पडद्यावर ही झळकण्यास सज्ज होताना पाहायला मिळणार आहे. लवकरच सूरज त्याच्या आगामी ‘राजाराणी’ या चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘राजाराणी’ या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचीच मन जिंकली. सूरज आता सत्य घटनेवर आधारित उलगडणार्‍या या प्रेम कथेतून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या दोस्ताच्या भूमिकेत सूरजला पाहणं फारच रंजक ठरणार आहे.

सिनेमात कोणकोण कलाकार?

चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे ही कलाकार मंडळी दिसणार आहेत. तर चित्रपटातील रोहनच्या मित्राच्या भूमिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे. सूरजचा ‘राजाराणी’ हा चित्रपट 18 ऑक्टोबर 2024 पासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.