Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय नार्वेकर करतोय ‘चमत्कार!’, नवं बालनाट्य लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चिमुकल्यांसाठी हास्याची पर्वणी

ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी लिखित आणि ऋषिकेश घोसाळकर दिग्दर्शित 'चमत्कार' हे बालनाट्य रंगभूमीवर येत आहे.

संजय नार्वेकर करतोय 'चमत्कार!', नवं बालनाट्य लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चिमुकल्यांसाठी हास्याची पर्वणी
चमत्कार बालनाट्य लवकरच रंगभूमीवरImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 8:20 AM

मुंबई : मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख असलेला, अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात तसेच टीव्ही मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा विनोदी अभिनेता संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) आता रंगभूमीवर चमत्कार करायला येत आहे. तसे पाहिले तर मनोरंजन क्षेत्रात चमत्कार नेहमी घडतच असतात. पण इथे जादुई चमत्कार घडणार असून तो प्रत्यक्षात रसिकांना पाहायला मिळणार आहे. कारण संजय नार्वेकर ‘चमत्कार’ या बालनाट्यात काम करतोय. साईराज निर्मित, ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी (Ratanakar Matkari) लिखित आणि ऋषिकेश घोसाळकर दिग्दर्शित ‘चमत्कार’ हे बालनाट्य (Children play) रंगभूमीवर येत आहे.

बालनाट्य म्हटले की गमती जमती, चमत्कार, गिमिक्स हे आलेच. ‘चमत्कार’ हे नाटक अभ्यास हया विषयावर अवलंबून आहे. घरात पैसा म्हणजे सगळं काही, अशी समज असणारे आई बाबा आपल्या मुलांना अभ्यासापासून नेहमी परावृत्त करत असतात. हया त्रासाला कंटाळलेली मुलं आपल्या आई बाबांचा कसा विरोध करतात. त्यांना त्रास देण्यासाठी कोणत्या वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात. त्यातूने ज्या काही गमती जमती, चमत्कार घडतात, ते हया नाटकात पाहायला मिळणार आहे.

ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी यांचे लेखन, अभिनेता संजय नार्वेकर यांचा अभिनय, ऋषिकेश घोसाळकर यांचे दिग्दर्शन आणि दर्जेदार बालनाट्यासाठी प्रसिध्द असलेली साईराज नाट्यसंस्था असा दुग्धशर्करा योग हया नाटकाद्वारे जुळून आला आहे. लेखक – दिग्दर्शक व निर्माते ऋषिकेश घोसाळकर यांनी आत्तापर्यंत अनेक लोकप्रिय बालनाटये व व्यावसायिक नाटकं सादर केली आहेत. त्यांचे “हरी आला दारी” हे व्यावसायिक नाटक खुपच लोकप्रिय झाले होते. ‘चमत्कार’ हे त्यांचे 12 वे व्यावसायिक नाटक आहे. त्याचा शुभारंभाचा प्रयोग गुरुवार दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहे.

‘चमत्कार’ या नाटकातून त्यांनी आजच्या मुलांचं भावविश्व साकारलं असून मनोरंजनाबरोबरच एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या नाटकातून केला आहे. आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता संजय नार्वेकर यात प्रमुख भूमिकेत असून सोबत हिमांगी सुर्वे, प्रियांका कासले, चिंतन लांबे, संदेश अहिरे, प्रणाली बोराले, नेहा चव्हाण, अर्चित टक्के, सुधांशु कुलकर्णी, नीलिशा लाड, स्वरा वाडकर, मानस वसाने, उर्वी पटेल, मनवा वसाने, तीर्थ पटेल हे कलाकार दिसणार आहेत. या नाटकाचे सुत्रधार गोट्याकाका सावंत असून व्यवस्थापक शेखर दाते आहेत. चमत्काराबरोबरच फूल टू मनोरंजन करणारे हे बालनाट्य लहानमुलांसह मोठ्यांसाठी देखील आकर्षण ठरणार आहे.

संबंधित बातम्या

रुपाली चाकणकर यांच्या मुलाचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

Aai Kuthe Kay Karte: ‘त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला’; सेटवरील खास व्यक्तीसाठी मिलिंद गवळी यांची पोस्ट

Photo Gallery | लाईफ लव्ह हर राईट बॅक…. मौनी रॉयचा हॉट समरलूकने चाहते घायाळ

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.