Covid Warrior : अभिनेते, निर्माते अमोल घोडके यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार, समाजासाठी काम करत राहण्यासाठी प्रेरणा
अमोल घोडके यांना कोविड योद्धा म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते समाजासाठी त्यांच्या निःस्वार्थ योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Covid Warrior: Actor, Producer Amol Ghodke Awarded by Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari, Inspiration to Continue Work for Society)
मुंबई : कोरोना महामारीच्या (Corona) कठीण काळात अनेक लोकांनी ‘कोविड योद्धा’ (Covid Warriors) म्हणून विविध प्रकारे देशाची सेवा केली आहे. त्यात अनेक डॉक्टर, सफाई कामगार, मानवतावादी, सामाजिक कार्यकर्ते सामील आहेत. अभिनेता, निर्माता अमोल घोडके हे असेच एक योद्धे आहेत. या कठीण काळात ते सर्व गरजू लोकांसाठी अखंडितपणे काम करत होते. अलीकडेच, दिपाली सय्यद चॅरिटेबल ट्रस्टने अशा कोविड योद्ध्यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात कौतुक चिन्ह देऊन सत्कार केला.
समाजासाठी असेच काम करत राहण्यासाठी दिली प्रेरणा
या कार्यक्रमात अमोल घोडके यांना कोविड योद्धा म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते समाजासाठी त्यांच्या निःस्वार्थ योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूप त्यांना ट्रॉफी, सन्मानपत्र (प्रमाणपत्र) आणि ₹ 50,000/- रक्कम प्रदान करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अमोल घोडके यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना समाजासाठी असेच काम करत राहण्यासाठी प्रेरणा दिली. याप्रसंगी बोलताना राज्यपाल म्हणाले की अमोल घोडके आणि त्यांच्यासारख्या लोकांमुळे कोव्हीड काळात असंख्य लोकांसाठी गोष्टी सुलभ झाल्या. यावेळी अभिनेत्री दिपाली सय्यद ह्यांनी देखील अमोलच्या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
अमोल घोडके यांनी व्यक्त केलं मत
याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अमोल घोडके म्हणाले की, “मला मिळालेल्या प्रेम आणि कौतुकाबद्दल मी खरोखरच सर्वांचा खूप आभारी आहे. यापुढे देखील समाजासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी अधिकाधिक समाजोपयोगी काम भविष्यात करण्याचा माझा प्रयत्न असेल तसेच पुरस्कार रूपाने मिळालेले हे 50,000/- रुपये देखील सामाजिक कार्यासाठी वापरणार आहे. या कार्यक्रमात के.ई.एम रुग्णालयाचे डॉ.हेमंत देशमुख, नायर रुग्णालयाचे डॉ.रमेश भारमल, कूपर रुग्णालयाचे डॉ.शैलेश मोहिते, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले तसेच आणखी काही मान्यवरांचा देखील गौरव करण्यात आला.
महामारीच्या काळात प्रत्येकाला त्रास सहन करावा लागला. अशा काळात अमोल घोडके यांनी अनेक लोकांना विविध प्रकारे मदत केली. त्यांनी अनाथ मुलांसाठी आणि अनाथाश्रमांसाठी अनेक स्तरांवर काम केले, ज्यामुळे त्यांना अशा कठीण काळात मदत झाली. गरजू लोकांना या काळात त्यांनी अनेक आर्थिक तसेच अन्नदान अश्या विविध स्वरूपात मदत केली. जेव्हा बरेच लोक बेड आणि उपचार घेऊ शकले नाहीत तेव्हा अमोल यांनी त्यांना मदत केली. मनोरंजन आणि डिजिटल मीडिया उद्योगात असतानाही अमोल घोडके नेहमी समाजाची आणि आपल्या राष्ट्राची सेवा करतात. त्यांचे असे निस्वार्थी कार्य निश्चितच कौतुकास, कृतज्ञता आणि सत्कारास पात्र आहे. अमोल घोडके यांच्या निरंतर प्रयत्नांसाठी आम्ही त्यांचे आभार आणि कौतुक करतो आणि त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी त्यांना शुभेच्छा देतो.
संबंधित बातम्या
Ananya Panday | आर्यन-अनन्याच्या संभाषणाची सखोल चौकशी होणार, अनन्या पांडे पुन्हा NCBला सामोरी जाणार!