लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला मराठीतले मोठे तारे-सितारे कुठे गायब होते? दबक्या आवाजात कुजबूज सुरु!

सामना दैनिकातील पान क्रमांत तीन वरील उजव्या कोपऱ्यात तळाला एक कॉलम छापण्यात आला आहे. यामध्ये लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला मराठी कलावंत कुठे दिसलेच नाहीत, असा दावा करण्यात आला आहे.

लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला मराठीतले मोठे तारे-सितारे कुठे गायब होते? दबक्या आवाजात कुजबूज सुरु!
अंतिम अलविदा!
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 9:30 PM

मुंबई : लता मंगेशकर यांच्या निधनानं (Lata Mangeshkar Death) भारतच काय तर पाकिस्तानही (Pakistan) हळहळला. अनेकांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. वेगवेगळ्या मान्यवरांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली. पण लता मंगेशकर यांच्या निधनानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील आपले पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करत मुंबईतील शिवाजी पार्कवर दाखल झाले. त्यांनीन लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. अमिताभ बच्चन शिवाजी पार्कवर दिसले नसले, तरी त्याआधीच त्यांनी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली. सकाळी अमिताभ बच्चन लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी आणि लतादीदींनी आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित झाले होते. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनीही अंत्ययात्रेत आपला सहभाग नोंदवला होता. किंग खान अंत्यदर्शनासाठी आला होता. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पूर्ण परिवार, राष्ट्रवादीचे बडे नेते, जावेद अख्तर, यांच्यासह अनेक महत्त्वाची नावं शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांना अंत्यदर्शन घेण्या आलेल्यांच्या यादीत घेता येतील. पण यातही शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनानं एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. मराठी कलावंत लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला कुठे दिसलेच नाहीत, असा दावा सामनाच्या वृत्तातून करण्यात आला आहे.

काय म्हटलंय ‘सामना’तून

7 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या सामना दैनिकातील पान क्रमांत तीन वरील उजव्या कोपऱ्यात तळाला एक कॉलम छापण्यात आला आहे. यामध्ये लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला मराठी कलावंत कुठे दिसलेच नाहीत, असा दावा करण्यात आला आहे. या कॉलममध्ये संतापजनक असा शब्द कोट करत म्हटलंय की,…

लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत लतादीदींनी श्रद्धांजली वाहण्यासाठी ब्रीच कॅन्डी रुग्णालय, प्रभुकुंज किंवा शिवाजी पार्कात धाव घेतली अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र काही मोजक्या कलावंतांशिवाय कुणीच तेथे फिरकले नाही. याबद्दल तीव्र संपात व्यक्त होत आहे. दीदींच्या दैवी आवाजातील गाण्यांमुळे ज्यांना ‘नायिका’ म्हणून प्रसिद्धी मिळाली त्यांनीही अंत्यदर्शनासाठी न येणे हे अधिकच संपातजनक होते. मराठी कलावंत तर कुठे दिसलेच नाहीत. काही जणांनी फक्त सोशल मीडियावर दोन ओळींची श्रद्धांजली वाहून सोपस्कार उरकला. या सर्वच कलावंतांबद्दल चाहत्यांमध्ये तीव्र संपात व्यक्त होत आहे.

अफसोस!

दैनिक सामनामध्ये लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दलचं हे निरीक्षण काही फक्त एकमेव नाही. तर दुसरीकडे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राजीव खांडेकर यांनीदेखील हाच विषय आपल्या ट्वीटमध्ये मांडलाय. त्यांनी म्हटलंय की,..

एवढ्या जणींना लतादीदींनी आवाज दिला… त्यातून या नट्यांचे करिअर बहराला आले. पण आज दिवसभरात त्यांच्यापैकी कुणीच दिसू नये…ना प्रभूकुंजवर, ना शिवतीर्थावर? अफसोस!

एकूण या निरीक्षणातून मराठीतले रथी महारथी, दिग्गज कलावंत, ज्यांच्या प्रतिक्रिया फोनवरुन घेण्यात आल्या, ज्यांनी वेगवेगळ्या कॅमेऱ्यासमोर लतादीदींबाबत शोक व्यक्त केला, त्यांनी लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी न येण्याचं जाणीवपूर्वक टाळलं की याचा काही आणखी वेगळा अर्थ काढला पाहिजे, अशी कुजबूजही सुरु झाली आहे.

संबंधित बातम्या :

ती इस्लामिक परंपरा माहितीय का, ज्यावरुन शाहरुख खान वादात सापडलाय? लता दिदींसाठीची ती ‘फुंकर’ नेमकी काय आहे?

Special Report | Shahrukh Khanला ट्रोल करणाऱ्यांनो, मेंदू तपासून घ्या! -tv9

Video | ‘बापलेकीचं नातं कसं असावं? तर असं असावं!’ ती गोष्ट पाहून मोदीही सुप्रिया-पवारांकडे बघत राहिले

Video | पंतप्रधान मोदी शिवाजी पार्कात आले! पवारांच्या बाजूला बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उठले आणि…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.