फक्त मराठी सिने सन्मान सोहळा 2022: ‘धर्मवीर’साठी प्रसाद ओकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार; अमृता खानविलकर ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान प्रसाद ओकला धर्मवीर चित्रपटासाठी मिळाला. तसंच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान अमृता खानविलकर हिला चंद्रमुखी चित्रपटासाठी मिळाला आहे.

फक्त मराठी सिने सन्मान सोहळा 2022: 'धर्मवीर'साठी प्रसाद ओकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार; अमृता खानविलकर ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
फक्त मराठी सिने सन्मान सोहळा 2022Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 9:46 AM

‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा 2022’ (Fakt Marathi Cine Sanman Sohla 2022) मोठ्या थाटात आणि दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत 27 जुलै रोजी अंधेरी इथं पार पडला. अमेय वाघ (Amey Wagh) आणि ओमकार भोजने यांनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती. दोघांनी आपल्या विनोदकौशल्याने कलाकारांचं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत निवेदनाची जबाबदारी उत्कृष्टरित्या पार पाडली. तर आशिष पाटीलच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला. या फक्त मराठी सिने सोहळ्याचा अत्यंत खास क्षण म्हणजे रंगभूषाकार विद्याधर भट्टे (Vidyadhar Bhatte) यांचा सन्मान. विद्याधर यांनी अनेक सिनेमांसाठी मोठमोठ्या भूमिकांना रूप देऊन घडवण्याचं कार्य केल आहे. ‘लगे रहो मुन्ना भाई’, ‘परिनीता’, ‘धर्मवीर’ अशा अनेक चित्रपटातल्या कठीण भूमिकांना रंग देऊन उभं केल. त्यांनी दिलीप प्रभावळकर, ऐश्वर्या राय-बच्चन, विद्या बालन अश्या अनेक दिग्गज कलाकारांना मेकअप करून हुबेहूब भूमिका घडवल्या. अशा विद्याधर भट्टे यांचा सन्मान अभिनेत्री विद्या बालन यांच्या हस्ते पार पडला.

तसंच मराठी चित्रपटसृष्टीची शान म्हणजेच गायक आणि संगीतकार अजय-अतुल. अनेक मराठी आणि हिंदी गाण्यांना वेडावून टाकणारे सूर आणि संगीत देऊन मराठीचा झेंडा सात समुद्रापार नेणाऱ्या या जादुई जोडीचा ‘फक्त मराठीने’ विशेष सन्मान जाहीर केला. आपल्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना या सोहळ्याला सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहता आले नाही. तर हरहुन्नरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला विको पॉप्युलर ‘फेस ऑफ द इयर’ या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

त्याचबरोबर मराठी चित्रपटसृष्टीला ज्यांनी गेले कैक दशकं उत्तमोत्तम भूमिकांनी आणि चित्रपटांनी खिळवून ठेवलं ते म्हणजे विनोदाचे बादशाह ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा देखील सन्मान ‘फक्त मराठीने’ केला. तसंच त्यांच्या काही गाजलेल्या विविध भूमिकांना घेऊन कलाकारांनी त्यांना मानवंदना म्हणून काही स्किट्स सादर केले. सचिन पिळगावकर यांच्या मातोश्री श्रीमती सुनीला शरद पिळगावकर यांच्या हस्ते ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात आलं.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान प्रसाद ओकला धर्मवीर चित्रपटासाठी मिळाला. तसंच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान अमृता खानविलकर हिला चंद्रमुखी चित्रपटासाठी मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट कथाकार हा सन्मान विश्वास पाटील यांना चंद्रमुखी चित्रपटासाठी मिळाला. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा सन्मान धर्मवीर चित्रपटासाठी प्रवीण तरडे यांना मिळाला आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान ‘धर्मवीर’ने पटकावला. फक्त मराठी सिने सन्मान सोहळ्याचं हे पाहिलंच वर्ष होतं. या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी, वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांच्या दमदार नृत्याने सर्वानाच वेड लावलं. हा सोहळा लवकरच ‘फक्त मराठी’ या वाहिनीवर प्रेक्षकांसाठी प्रसारित करण्यात येणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.