Happy Birthday Asha Bhosle | वयाच्या 88व्या वर्षी सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलं ‘हवाहवाई’ चित्रपटासाठी गाणं!

गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या, सदैव सळसळते उत्साही व्यक्तिमत्त्व असलेल्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी वयाच्या 88व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी पुन्हा एकदा आवाज दिला आहे.

Happy Birthday Asha Bhosle | वयाच्या 88व्या वर्षी सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गायलं 'हवाहवाई' चित्रपटासाठी गाणं!
आशा भोसले
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 7:46 AM

मुंबई : गेली अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या, सदैव सळसळते उत्साही व्यक्तिमत्त्व असलेल्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांनी वयाच्या 88व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी पुन्हा एकदा आवाज दिला आहे. महेश टिळेकर दिग्दर्शित आगामी “हवाहवाई” या चित्रपटातील उडत्या चालीचे गाणे आशाताईंनी गायलं असून, या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षानंतर त्यांनी मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे. आज (8 सप्टेंबर) आशा भोसले आपला वाढदिवस साजरा करत आहेत.

“हवाहवाई” या चित्रपटाची निर्मिती मराठी तारका प्रॉडक्शनच्या महेश टिळेकर आणि नाईंटी नाईन प्रॉडक्शनच्या विजय शिंदे यांनी केली आहे. पंकज पडघन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं असून महेश टिळेकर यांनीच लिहिलेल्या ‘जगण्याची ही मजा घेऊया नव्याने, जाऊया पुढे पुढे साऱ्यांच्या साथीने दिशा नव्या वाटे हव्या, साद देती आता उडण्याची…’, असे शब्द असलेलं गाणं वयाची 88 वर्षे पूर्ण करणाऱ्या आशाताई भोसले यांच्या सुमधुर आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे.

वयाच्या 88व्या वर्षात पदार्पण

भारतीय चित्रपट क्षेत्रात जवळपास प्रत्येक भाषेतील चित्रपटासाठी आशाताई यांनी गाणी गायली आहेत. “हवाहवाई” चित्रपटातील त्यांचे हे गाणे  ऐकून त्या 88 वर्षाच्या आहेत, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही इतक्या अप्रतिम पद्धतीनं आशाताईंनी गाणं गायलं आहे. बऱ्याच वर्षांनी आशाताईंनी मराठी चित्रपटासाठी गाणं गायल्यानं स्वाभाविकपणे या गाण्याविषयी आणि महेश टिळेकर दिग्दर्शित “हवाहवाई” चित्रपटाविषयीही उत्सुकता निर्माण झाली आहे. मल्टीस्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात काही नवीन कलाकारांनाही संधी देण्यात आली आहे.

ऐका गाणे छोटीशी झलक :

अष्टपैलू गायिका

आशा भोसले या अष्टपैलू दक्षिण आशियाई गायकांपैकी एक मानल्या जातात. तिच्या गाण्यांच्या श्रेणीमध्ये चित्रपट संगीत, पॉप, गझल, भजन, पारंपारिक भारतीय शास्त्रीय संगीत, लोकगीते, कव्वाली, रवींद्र संगीत आणि नजरूल गीते यांचा समावेश आहे. त्यांनी आसामी, हिंदी, उर्दू, तेलुगू, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, इंग्रजी, रशियन, चेक, नेपाळी, मल्याळम आणि मलय यासह 14हून अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

आर. डी. बर्मन आणि अशाजींची सुपरहिट जोडी

1966मध्ये आशा भोसले यांनी आर.डी. बर्मन यांच्या “आजा आजा मैं हूँ प्यार तेरा …” गाण्यासाठी आवाज दिला, ज्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. यामुळे त्याच्या आयुष्याला एक नवीन वळण आले, जे त्याच्या कारकिर्दीतील दुसरा महत्त्वाचा टप्पा मानला जाऊ शकते. शास्त्रीय संगीतापासून पाश्चात्य सूर गाण्यात प्रभुत्व मिळवलेल्या आशा भोसले यांनी 1981साली प्रदर्शित झालेल्या ‘उमराव जान’ चित्रपटातून गायनाची शैली बदलली.

हिंदी-मराठी गाण्यांबरोबरच आशा भोसले यांनी परदेशी गाण्यांमध्येही छाप पाडली आहे. आशा भोसले यांनी कॅनडा, दुबई आणि अमेरिकेत अनेक स्टेज शो केले आहेत आणि आपला ठसा उमटवला आहे. 1994 मध्ये, आर.डी. बर्मन यांच्या निधनाने आशा भोसले यांना खूप धक्का बसला आणि त्यांनी काहीकाळ गायनाकडे पाठ फिरवली. पतीच्या निधनाने दुःखी झालेल्या आशा यांनी काही काळ गायनापासून अंतर राखले. परंतु, 1995मध्ये संगीतकार ए.आर. रहमान यांनी “रंगीला” चित्रपटासाठी आशा भोसले यांना गाण्यासाठी राजी केले. त्यानंतर त्यांनी पुन्हा गाण्यास सुरुवात केली.

हेही वाचा :

Eco Friendly Ganesh Chaturthi 2021 | अभिनेता शरद केळकरने अवघ्या काही मिनिटांत साकारला इको-फ्रेंडली गणपती बाप्पा, पाहा खास व्हिडीओ

‘जिस दिन तुमको देखेगी नजर, जाने दिल पर होगा क्या असर…’, पाहा ‘कबीर सिंग’ फेम वनिता खरातच्या घायाळ करणाऱ्या अदा!

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.