AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prajakta Mali: ‘उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा’; प्राजक्ता माळीचा राज ठाकरेंना पाठिंबा

#शांतताप्रिय #त्रस्तनागरिक हे हॅशटॅग तिने वापरले होते. मात्र काही वेळानंतर तिने तिची ही पोस्ट एडिट केली. फक्त शुभेच्छा देणारा मजकूर ठेवत तिने बाकी सर्व डिलिट केलं. इतकंच नव्हे तर या पोस्टवरील कमेंट्स तिने बंद केले. त्यामुळे नेटकरी त्यावर व्यक्त होऊ शकत नाहीत. (Prajakta Mali)

Prajakta Mali: 'उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा'; प्राजक्ता माळीचा राज ठाकरेंना पाठिंबा
Prajakta Mali and Raj ThackerayImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 3:27 PM

सरळ सांगून भोंगे निघणार नसतील तर मग होऊन जाऊ द्या एकदा, अशी आक्रमक भाषा वापरत औरंगाबाद इथल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजविण्याची भूमिका जाहीर केली. 3 मेपर्यंत मी वाट बघणार, पण 4 मे नंतर काय होईल ते होऊ द्या, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यांच्या या विधानानंतर आता अभिनेत्री प्राजक्ता माळीची (Prajakta Mali) पोस्ट चर्चेत आली आहे. ‘आज 3 तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते’, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलंय. प्राजक्ताने अक्षय तृतीया आणि त्यासोबत ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. त्यात तिने राज ठाकरेंच्या भाषणाचाही उल्लेख केला.

प्राजक्ता माळीची पोस्ट-

‘सगळ्यांचं सुख, समाधान, ऐश्वर्य अक्षय्य राहो, हीच प्रार्थना. सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या तसंच मुस्लीम बांधवांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. (आज सोनं खरेदीचा दिवस म्हणून अंगावर सर्वाधिक सोनं असलेला फोटो टाकतेय.) असो, आज 3 तारीख, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. धन्यवाद… मा. श्री. राज ठाकरे सगळ्याचसाठी. परवाच्या संभाजीनगर सभेतील हिंदूंच्या- महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचं तुमचं भाषण ऐकून ऊर अभिमानानं भरून आला, अंगावर स्फुरण चढलं, नवचेतना जागृत झाली. हल्ली अशा प्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटतं? खूप धन्यवाद’ अशी पोस्ट तिने लिहिली. त्याचसोबत #शांतताप्रिय #त्रस्तनागरिक हे हॅशटॅग तिने वापरले होते. मात्र काही वेळानंतर तिने तिची ही पोस्ट एडिट केली. फक्त शुभेच्छा देणारा मजकूर ठेवत तिने बाकी सर्व डिलिट केलं. इतकंच नव्हे तर या पोस्टवरील कमेंट्स तिने बंद केले. त्यामुळे नेटकरी त्यावर व्यक्त होऊ शकत नाहीत.

हे सुद्धा वाचा

प्राजक्ताची मूळ पोस्ट-

प्राजक्ताची एडीट केलेली पोस्ट-

दुसरीकडे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद पोलिसांनी ही कारवाई केली. सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्यावर भडकावू भाषण, वैयक्तीक टीका टिप्पणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

प्राजक्ताने दादरमधील शिवाजी पार्क मैदानात गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मनसे मेळाव्यालाही हजेरी लावली होती. ‘नाही नाही, कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली (खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती) ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करतेय, इतकाच हेतू,’ असं तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत स्पष्ट केलं.

'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.