लतादीदींच्या गाण्यांची नक्कल करत गाणं शिकल्या, सुषमादेवींच्या आवाजाला तोड नाही; वाचा सविस्तर

आंबेडकरी चळवळीतील सुरुवातीच्या दोन पिढ्या प्रचंड ध्येयवादी होत्या. (I learned to sing only after listening to Lata Didi's songs, says sushma devi)

लतादीदींच्या गाण्यांची नक्कल करत गाणं शिकल्या, सुषमादेवींच्या आवाजाला तोड नाही; वाचा सविस्तर
sushma devi
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 5:05 PM

मुंबई: आंबेडकरी चळवळीतील सुरुवातीच्या दोन पिढ्या प्रचंड ध्येयवादी होत्या. घरावर तुळशीपत्रं ठेवून आंबेडकरी विचार घराघरात पोहोचवण्याचं काम या पिढीने केलं. या पिढीतील कलावंतांनीही आपल्या गाण्याच्या माध्यमातून प्रबोधनाच्या चळवळीला पेटतं ठेवलं. सुषामादेवीही त्यापैकीच एक होत्या. त्यांनीही प्रबोधनाच्या चळवळीचा झेंडा खांद्यावर घेऊन गायनाच्या माध्यमातून गावागावात जाऊन लोकांचं प्रबोधन केलं. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. (I learned to sing only after listening to Lata Didi’s songs, says sushma devi)

पाचव्या वर्षापासून गायनास सुरुवात

वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासूनच त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. खेळण्या बागडण्याच्या वयातही त्या प्रबोधनाच्या चळवळीकडे त्या वळल्या. सुषमादेवी आणि त्यांची बहीण लक्ष्मीदेवी दोघींनीही लहान वयापासूनच गाणी गायला सुरुवात केली. सुषमादेवींची आई वांचळाबाई आणि वडील जगन्नाथ जावळे दोघेही गायक होते. वडील तबलाही वाजवायचे. तर बहीण हार्मोनियम वाजवायची. हे सर्वजण मिळून सिनेमाच्या चालीवरील गाणी गायची. त्यातून चार पैसे मिळायचे आणि घर खर्च चालायचा. वयाच्या 10 व्या वर्षी सुषमादेवींनी बाबासाहेबांवरील पहिलं गाणं गायलं.

आई मी जातो भीमाच्या घरी, येणार नाही पुन्हा माघारी…

सुषमादेवींनी गायलेलं हे पहिलं गाणं. जीने की राह या सिनेमातील एका गाण्याच्या चालीवरील हे गाणं होतं. हे गाणं त्या तन्मयतेने गायच्या.

पहिलाच कार्यक्रम हाऊसफुल्ल

त्रिसरणाची, पंचशीलेची, मंगलमय धम्माची, करीन आरती धरतीवरती मंगलमय नामाची, लेक मी भीमाची, नात आहे गौतमाची…

वामनदादा कर्डक यांचं स्वतंत्र चालीवरील त्यांचं हे गाणं त्याकाळी खूप गाजलं. बाबासाहेबांचं स्वतंत्र चालीवर गायलेलं त्यांचं हे पहिलंच गाणं होतं. या गाण्यामुळे त्यांना गायिका म्हणून ओळख मिळवून दिली. नागपुरात त्यांचा किसन खरात यांच्यासोबत यांच्याबरोबर गाण्याचा पहिला सामना झाला. हा सामना तिकीट लावून झाला होता. हे विशेष. नवख्या गायिकेला तिकीट लावलेला कार्यक्रम मिळणं आणि त्या कार्यक्रमाला तुफान गर्दी होणं ही त्याकाळातील मोठी गोष्ट होती. ही गर्दी होण्यामागे कारणही तसंच होतं. गायिका म्हणून सुषमादेवी तेव्हा नागपुरातील घराघरात पोहोचलेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती.

लतादीदींची गाणी ऐकून…

सुषमा देवींनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले नाहीत. त्यांना आवाजाची देणगी उपजतच लाभली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची गाणी त्या प्रचंड ऐकायच्या. लतादीदी गातात तसं हुबेहुब गाण्याचा त्या प्रयत्न करायच्या. हीच त्यांची संगीत साधना होती. त्यातूनच त्यांना हरकती, ताना, मुरक्या, आरोह-अवरोहची जाण आली. त्यांची बहीण लक्ष्मीदेवींना त्यांना घरीच गाणं शिकवलं. त्यामुळे त्यांचा आवाज तयार झाला. आजही त्या खणखणीत गातात, त्यांच्या आवाजाला आजही तोड नाही. त्यांचे पती विश्वकांत महेशकर स्वत: संगीतकार, गीतकार आणि हार्मोनियम मास्टर होते. बहीण लक्ष्मीदेवी आणि पती विश्वकांत महेशकर हे दोघेही त्यांचे खऱ्या अर्थाने गुरु आहेत. (साभार, आंबेडकरी कलावंत) (I learned to sing only after listening to Lata Didi’s songs, says sushma devi)

संबंधित बातम्या:

पत्ता बदलला, गाणं सोडून दिलं, आवाज बसला, अनेक अफवा उठूनही ‘ही’ गायिका डगमगली नाही; वाचा सविस्तर

वडील कडिया काम करायचे, गाणं शिकल्या नाहीत, पण आवाज दमदार; वाचा, वैशाली शिंदे कशा घडल्या?

गाजलेल्या ‘नाजुका’ मालिकेत काम करण्याची ऑफर नाकारली, आज पश्चात्ताप; गायिका नंदा नांद्रेकर काय म्हणतात?

(I learned to sing only after listening to Lata Didi’s songs, says sushma devi)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.