डिजिटलच्या युगात सायकलवरून प्रोमोशन, ‘जयंती’साठी तरुणाचा मुंबई ते नागपूर सायकलवरून प्रवास!

सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्या हातात आणून ठेवलं आहे. जगभरातल्या घडामोडी, बातम्या तसेच नव्या गोष्टी अगदी एक क्लिक वर आपल्याला समजतात पण आजही काही ठिकाणं अशी आहेत जिथे पारंपरिक पद्धतीच्या जाहिरातबाजीने प्रभाव अधिक प्रखरतेने पडताना आपण पाहतो.

डिजिटलच्या युगात सायकलवरून प्रोमोशन, ‘जयंती’साठी तरुणाचा मुंबई ते नागपूर सायकलवरून प्रवास!
Jayanti promotion
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 9:49 AM

मुंबई : सोशल मीडियाने संपूर्ण जग आपल्या हातात आणून ठेवलं आहे. जगभरातल्या घडामोडी, बातम्या तसेच नव्या गोष्टी अगदी एक क्लिक वर आपल्याला समजतात पण आजही काही ठिकाणं अशी आहेत जिथे पारंपरिक पद्धतीच्या जाहिरातबाजीने प्रभाव अधिक प्रखरतेने पडताना आपण पाहतो. 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या “जयंती” या सिनेमाबद्दल काहीसं असच म्हणावं लागेल. चित्रपटाच्या नावावर आणि टिझरच्या प्रेमात असलेल्या एका युवकाने चक्क या चित्रपटाचं प्रोमोशन एक वेगळ्या अंदाजात करण्याची ईच्छा सिनेमाच्या दिग्दर्शकांसमोर ठेवली आणि त्याची ही इच्छा ऐकून जयंतीची संपूर्ण टीम अवाक् झाली.

शोएब बागवान असं या युवकाचे नाव आहे. तो मुंबई येथील रहिवासी असून एका ऑटोमोबाईल कंपनीमध्ये वर्कशॉप मॅनेजर या पदावर काम करत आहे.  सोशल मीडियाद्वारे नुकताच जारी करण्यात आलेल्या जयंतीच्या पोस्टर आणि टिझरने तसेच चित्रपटाच्या एकूण विषयाच्या प्रेमात असलेला हा तरुण आपणसुद्धा या चित्रपटाची प्रसिद्धी करावी, असा विचार त्याच्या मनात आला. पूर्वी कोणत्याही चित्रपटाची, नाटकाची माहिती सांगण्यासाठी काही लोकं चालत, नंतर कालांतराने सायकल किंवा गाड्यांतून फिरत दवंडी देत, त्या चित्रपटाबद्दल किंवा एखाद्या नाटकाबद्दल लोकांना माहिती द्यायचे आणि स्थानिक त्या ठरलेल्या वेळी एकत्र येऊन चित्रपट किंवा नाटक पहायचे. अगदी त्याचप्रमाणे शोएब दादर-चैत्यभूमी ते नागपूर-दीक्षाभूमी हा तब्बल 830 किलोमीटरचे अंतर सायकल ने पार करून चित्रपटाच्या प्रदर्शनापर्यंत ठरलेल्या ठिकाणांहून जात गावाच्या वेशीवर येत लोकांना याबद्दल सांगणार आहे. यासाठी शोएबने त्याच्या कामावरून तब्बल एक महिन्यांची सुट्टी घेतली आहे.

चांगला विषय लोकांपार्यात पोहोचावा!

याबद्दल शोएब सांगतो की, “जयंती जसं याचं नाव जितकं हटके आहे, तितक्या हटके पद्धतीने याची प्रसिद्धीदेखील झाली पाहिजे. जास्तीत जास्त लोकांना या चित्रपटाबद्दल समजावं आणि एक चांगला विषय लोकांपर्यंत पोहचावा, हे या सायकल राईडच उद्दिष्ट आहे.” याबद्दल आपले मत व्यक्त करताना दिग्दर्शक शैलेश नरवाडे सांगतात, “शोएब सारखे तरुण या चित्रपटाला प्रेक्षक म्हणून लाभले यातच सर्वकाही आलं. प्रदर्शनाआधीच आम्हाला सर्वच वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा आम्हाला आनंद आहे.”

दशमी स्टुडिओज प्रस्तुत मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित जयंती हा दर्जेदार मराठी सिनेमा येत्या 12 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे

वेळेआधीच प्रदर्शन

सरकारने चित्रपटगृहे सुरु करण्यास दिलेली परवानगी, तसेच दिवाळीची सुट्टी यामुळे ऐन मौक्यावर उत्साही वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे तब्बल 20 महिन्यांच्या कालावधी नंतर प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये नक्कीच गर्दी करणार या आनंदात असलेले मराठी चित्रपट निर्माते तसेच दिग्दर्शक अचानकपणे झालेल्या एका बॉलिवूड चित्रपटाच्या एंट्रीमुळे प्रश्नात पडले आहेत. सर्व प्रकारचे परिपूर्ण नियोजन करून प्रदर्शनाची तारीख जवळपास 8 आठवडे अगोदर जाहीर करून सर्वत्र चर्चा झालेला मराठी चित्रपट ‘जयंती’ येत्या 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याच्या वाटेवर होता. परंतु, बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट ‘अंतिम’ नेमका 26 नोव्हेंबर रोजीच प्रदर्शित होत असल्याची अचानक घोषणा झाली आणि परिणामी या निर्णयामुळे महाराष्ट्रात परत मराठी चित्रपटांची गळचेपी होतेय की, काय अशी परिस्थिती दिसून आली. परिणामी हा चित्रपट 12 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहे.

हेही वाचा :

उत्सव लेखकांचा, दिग्दर्शकांचा आणि निर्मात्यांचा, पडद्यामागच्या कलाकारांचा होणार सन्मान!

संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग, ‘ओव्यांच्या खजिन्या’ने दिवाळी होणार चैतन्यदायी!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.