शादी करना सबके लिए… प्राजक्ता माळीकडून तरुणाईंच्या मनातील प्रश्नाला हात; हसत हसत श्री श्री रविशंकर काय म्हणाले?
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. तिच्या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडत आहे. तसेच हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
बंगळुरू : आपल्या अभिनयासह महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनाने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. खास करून अध्यात्मावरील तिचं प्रेम आणि राजकीय मतांमुळे ती सातत्याने चर्चेत असते. रोखठोक मते असलेली प्राजक्ता सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे. प्राजक्ता सध्या तिच्या एका प्रश्नामुळे चर्चेत आहे. तिने चक्क अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनाच हा प्रश्न विचारल्याने ती चर्चेत आहे. तिचा या प्रश्नाचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
महाशिवरात्रीचं निमित्त साधून प्राजक्ता माळी बंगळुरूला आली होती. आपले अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात प्राजक्ताने हजेरी लावली होती. यावेळी तिने सत्संगात भाग घेतला. या सत्संगात प्रश्नोत्तराच्या तासात प्राजक्ताने श्री श्री रविशंकर यांना एक प्रश्न विचारला. त्यावर श्री श्री रविशंकरही मिश्किल हसले. त्यांनी दाढीवरून हात फिरवला आणि मजेदार उत्तर दिलं. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
अन् हशा पिकला
शादी करना सबके लिए कंपल्शन्स है क्या, असा सवाल प्राजक्ता माळीने श्री श्री यांना विचारला. प्राजक्ताने जणू तरुणाईच्या मनातीलच प्रश्न श्री श्री यांना विचारला. या अनपेक्षित प्रश्नावर श्री श्री रविशंकर मिश्किल हसले.. त्यांनी उलटा सवाल केला. आप हमसे पुछ रही है ये बात?, श्री श्रीने असा सवाल करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. स्वत: प्राजक्ताही खळखळून हसली. श्री श्री रविशंकर यांनीही दाढीवरून हात फिरवत स्मित हास्य केलं.
खूश राहणं महत्त्वाचं
अशी गरज असती तर माझ्या बाजूला कधीच एक अजून खुर्ची लागलेली असती… किंवा डबल सोफा लावण्याची गरज असती… श्री श्री रविशंकर यांनी पुढची गुगली टाकली आणि पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली. नंतर श्री श्री रविशंकर गंभीर झाले. त्यांनी प्राजक्ताच्या प्रश्नाचं गंभीरतेने उत्तर दिलं. जीवनाचं रहस्य सांगितलं. अशी काही गरज नाही. आनंदी राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही लग्न करून आनंदी राहा किंवा एकटं राहून आनंदी राहा. काही लोक लग्न करूनही दु:खी असतात किंवा एकटे राहूनही दु:खी असतात.
दोन प्रकारचे लोक असतात. काही केलं तरी दु:खी राहतात. काही प्रकारचे लोक लग्न करूनही खूश असतात. एकटे राहूनही खूश असतात. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा. खूश राहणं हाच पर्याय तुम्ही निवडावा. तेच गरजेचं आहे, असं रविशंकर यांनी सांगितलं.
कमेंटचा पाऊस
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. तिच्या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पडत आहे. तसेच हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. खासकरून प्राजक्ताच्या थेट लग्नाच्या प्रश्नामुळे तिच्या व्हिडीओला नेटीझन्सची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.