Kiran Mane: एवढा ‘टायमिंग’चा बाप तू.. पण ‘जाण्याचं’ टायमिंग चुकवलंस दोस्ता; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

विनोदाची उत्तम जाण, जबरदस्त टायमिंग सेन्स या गुणांमुळे त्यांनी अल्पावधीतच नाटक, सिनेमा आणि टीव्ही या तिन्ही माध्यमांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. सतीश तारे यांच्यासाठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर एक पोस्ट (FB post) लिहिली आहे.

Kiran Mane: एवढा 'टायमिंग'चा बाप तू.. पण 'जाण्याचं' टायमिंग चुकवलंस दोस्ता; किरण मानेंची पोस्ट चर्चेत
किरण मानेंची पोस्ट चर्चेत Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 6:04 PM

आपल्या विनोदी अभिनयाने मराठी रसिकांचं दिलखुलास मनोरंजन करणारे अस्सल विनोदी अभिनेते आणि रंगकर्मी सतीश तारे (Satish Tare) यांच्या निधनाला नऊ वर्षे झाली. सतीश तारे यांनी आपल्या हरहुन्नरी व्यक्तीमत्त्वामुळे अभिनय, लेखन, दिग्दर्शन, नाट्यनिर्मिती अशा नाटकाच्या सगळ्याच प्रांतात मुक्त मुशाफिरी केली. विनोदाची उत्तम जाण, जबरदस्त टायमिंग सेन्स या गुणांमुळे त्यांनी अल्पावधीतच नाटक, सिनेमा आणि टीव्ही या तिन्ही माध्यमांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. सतीश तारे यांच्यासाठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर एक पोस्ट (FB post) लिहिली आहे. एवढा ‘टायमिंग’चा बाप तू.. पण ‘जाण्याचं’ टायमिंग चुकवलंस दोस्ता, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

किरण माने यांची पोस्ट-

‘आमच्यातनं जाऊन तुला आज नऊ वर्ष झाली. नाटकात तू खाली पडल्यावर, शरीराची खत्त्तरनाक नागमोडी वळणं घेत वर उसळी मारायचास. टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. तशीच मागच्या वर्षीची ही पोस्ट ‘सर्रकन’ वर आलीय भावा. तुला काय म्हणू गड्या? अष्टपैलू? हरहुन्नरी? गुणी?? अफलातून-कलंदर-अवलिया??? नाय नाय नाय नाय.. ही सग्ग्गळी विशेषणं फिकी पडतील इतका महान होतास तू! पण बेफिकीरपणे जगलास आणि त्याच बेफिकीरीने गेलास. आम्हा सगळ्यांचं डोंगराएवढं नुकसान करून ठेवलंयस माहितीय का तुला? तू कधीच कुणाची नक्कल केली नाहीस. ‘स्वत:ची एक वेगळीच श्टाईल असलेला’ खराखुरा विनोद’वीर’ होतास तू. साध्या-साध्या वाक्यांच्याही विशिष्ठ उच्चारातून – बिनचूक शब्दफोडीतून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा तुझ्यासारखा अफाट नट मी आजवर पाहिला नाही. तुझी ‘आंगीक लवचिकता’ केवळ अ फ ला तू न! नादखुळा!! जबराट!!!’

‘तू निव्वळ ‘महान’ अभिनेता होतास. उत्तम लेखक-दिग्दर्शक-गायक-वादक. ‘ऑल इन वन’ होतास राव! हार्मोनियम, गिटार, तबला अशा वाद्यांवर सफाईनं हात फिरायचा तुझा. पण अनेक मनस्वी कलावंतांना असलेला एक ‘शाप’ तुलाही होता. नाहीतर ही वेळ होती का यार जायची?? आज किती नाट्यरसिकांना माहिती असंल की आपण काय गमावलंय. आपल्यातनं जो गेला तो किती ‘महान’ होता.. माहितीय??? बोलता-बोलता कधी मी सतीश तारेची तुलना चार्ली चॅप्लीन आणि जिम कॅरीशी केली तर तुला फारसं न पाहिलेल्या लोकांना वाटतं ‘किरण माने जरा अतीच कौतुक करतोय.’ मी जेव्हा कधी विनोदी नाटक बघतो, तेव्हा क्वचित कधीतरी ‘हा रोल सतीश तारेने केला असता तर?’ हा विचार मनाला शिवला तरी मी पुढचं नाटक पाहू शकत नाही. मी कुणाला कमी लेखत नाही. आजही चांगले-शैलीदार विनोदवीर आपल्यात आहेत, पण तरीही ‘सतीश तारे’ या अवलियाचे जबराट-छप्परतोड ‘परफॉरमन्सेस’ ज्यांनी पाहिलेत, त्यांना माझं म्हणणं मनापास्नं पटंल. असो…तरीही आज मी लै लै लै हसणारय सतीश. खळखळून- मनापासून हसणारय.. कारण आज मी तुझं ‘ऑल लाईन्स क्लीअर’ हे नाटक बघणारय. डोळ्यात पाणी येईपर्यन्त हसणारय. लैच लवकर गेलास रं भावा. एवढा ‘टायमिंग’चा बाप तू.. पण ‘जाण्याचं’ टायमिंग चुकवलंस दोस्ता. तुला प्रत्यक्ष भेटून चिक्कार वेळा केलाय. आज परत एकदा तुला कडकडीत सलाम. लब्यू,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

हे सुद्धा वाचा

‘श्यामची मम्मी’, ‘आम्ही बिघडलो’, ‘असा मी असामी’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘रात्रीच घोटाळा झाला’, ‘गोलगोजिरी’ ही त्यांची नाटकं गाजली. तर ‘नवरा माझा नवसाचा’, ‘वळू’, ‘बालक पालक’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.