बदाम पाडायला गेले अन् बाबासाहेबाचं दर्शन झालं; वाचा, शाहीर यमराज पंडित यांचा अविस्मरणीय किस्सा!

'माझी दहा भाषणं आणि शाहिरांचं एक गाणं बरोबरीचं आहे', असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. ते खरंही आहे. स्वत: बाबासाहेबांना शाहिरीची ताकद माहीत होती. (shahir yamraj pandit)

बदाम पाडायला गेले अन् बाबासाहेबाचं दर्शन झालं; वाचा, शाहीर यमराज पंडित यांचा अविस्मरणीय किस्सा!
bheem geet
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 7:42 AM

मुंबई: ‘माझी दहा भाषणं आणि शाहिरांचं एक गाणं बरोबरीचं आहे’, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. ते खरंही आहे. स्वत: बाबासाहेबांना शाहिरीची ताकद माहीत होती. त्यामुळेच ते कलावंतांची कदर करायचे. त्याकाळात अनेक शाहिरांना बाबासाहेबांचा सहवास लाभला. शाहीर यमराज पंडित यांनाही बाबासाहेबांना जवळून पाहण्याचा योग आला. पण तेव्हा शाहीर यमराज पंडित खूप लहान होते. शाळेत जायच्या वयात त्यांना बाबासाहेबांना पाहता आलं. शाहिरांचा हा किस्सा वाचाच. (know how shahir yamraj pandits met babasaheb ambedkar?)

लक्ष्मणचे यमराज झाले त्याची गोष्ट

लक्ष्मण शहाजी पंडित हे शाहीर यमराज पंडित यांचं खरं नाव. शाहिरांची गीते स्फोटक होते. त्यामुळे गाणी आणि आपलं नाव यात बरंच अंतर असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत:चं नाव बदलून यमराज ठेवलं. शाहिरांच्या आजोबांचं नाव यमाजी होतं. त्यामुळे त्यांनी आजोबांच्या नावावरून आपलं नाव बदललं आणि तेव्हापासून यमराज पंडित अशीच त्यांची ओळख निर्माण झाली.

बदाम पाडायच्या सवयीने…

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अणे हे त्यांचं गाव. पण त्यांचा जन्म आजोळी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे झाला. 15 ऑक्टोबर 1930 हे त्यांचं जन्म वर्ष. पारनेरमध्येच इयत्ता दुसरीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. पुढे त्यांचे आईवडील मुंबईत पोटापाण्यासाठी आले. मुंबईत धोबी तलावाजवळील अब्दुल कादर छत्रीवाला चाळीत पंडित कुटुंब राहत होतं. त्यांच्या घराजवळच मशीद होती. लॉर्ड हॅरिस शाळेत इयत्ता चौथीत पंडित यांचं नाव टाकण्यात आलं. शाळा सुटल्यावर बदाम पाडायला जाणं हा त्यांचा आवडता छंद होता. त्याकाळात चर्चगेट ते मरीन लाईन्स मार्गावर बदामाची प्रचंड झाडे होती. त्यावेळी चर्चगेट जवळच्या इन्कम टॅक्स ऑफिसजवळ सिद्धार्थ नाईट हायस्कूलचे बांधकाम सुरू होते. या नाईट स्कूलच्या आवारात बदामाची खूप झाडे होती. त्यामुळे पंडित हे मित्रांबरोबर नाईट स्कूलच्या आवारात बदाम तोडायला जायचे. असेच एकदा बदाम तोडायला नाईट स्कूलच्या आवारात गेले असता त्यांना बाबासाहेबांना जवळून पाहण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला.

अन् साक्षात देव भेटला…

एकदा धोबी तलाव येथे जयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. मशिदीजवळूनच ही मिरवणूक निघाल्याने काही मुसलमानांनी ही मिरवणूक आडवली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. हे प्रकरण बाबासाहेबांकडे गेलं. स्वत: यमराज पंडित आणि त्यावेळचे कार्यकर्ते दडूबा दावडीकर हे सायकलवरून बाबासाहेबांना भेटायला गेले आणि त्यांनी हा प्रकार बाबसाहेबांना सांगितला. तेव्हा अगदी पंडित यांना बाबासाहेबांना अगदी जवळून पाहण्याचा योग आला. आज पंडित हयात नाहीत. पण ते जेव्हा हा किस्सा सांगायचे आणि बाबासाहेबांचं वर्णन करायचे तेव्हा त्यांचं मन हेलावून जायचं. त्यांच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागायचे. (साभार : ‘आंबेडकरी कलावंत’मधून) (know how shahir yamraj pandits met babasaheb ambedkar?)

संबंधित बातम्या:

‘शुक्रिया’ ते ‘पोस्ट कामगार’… साजन शिंदेंच्या माहीत नसलेल्या ‘या’ गोष्टी वाचाच

गायक साजन शिंदेंची कमाल; जिथे कोरस दिला, तोच स्टेज गायक म्हणून गाजवला!

गुरूशीच सामना रंगला, गझलेच्या प्रांतातही मुशाफिरी; गौतम संकपाळ यांचा हा सफरनामा वाचाच!

(know how shahir yamraj pandits met babasaheb ambedkar?)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.