वडिलांपाठोपाठ आईही गेली… महेश कोठारे यांच्या आईचं वृद्धापकाळाने निधन

वृद्धापकाळात सरोज कठारे यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. महेश कोठारे यांना मातृशोक झाल्याचं कळताच मराठी सिनेसृष्टी आणि सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कोठारे यांना फोन करून त्यांचं सांत्वन केलं.

वडिलांपाठोपाठ आईही गेली... महेश कोठारे यांच्या आईचं वृद्धापकाळाने निधन
Saroj KothareImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 7:27 AM

मुंबई, दिनांक 16 जुलै 2023 : प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांना मातृशोक झाला आहे. महेश कोठारे यांच्या आई सरोज ऊर्फ जेनमा अंबर कोठारे यांचं शनिवारी निधन झालं आहे. त्या 93 वर्षाच्या होत्या. जानेवारी महिन्यातच महेश कोठारे यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर काल त्यांच्या मातोश्रीनेही जगाचा निरोप घेतला. सरोज कोठारे यांच्या मागे मुलगा महेश कोठारे, सून, नातू आदिनाथ कोठारे, नातसून ऊर्मिला कोठारे आणि पणतू असा परिवार आहे.

हे सुद्धा वाचा

आदिनाथ आणि ऊर्मिला कोठारे यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आजीचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. स्व. सौ. सरोज अंबर कोठारे (जेनमा) (१९/०६/१९३० – १५/०७/२०२३) संपूर्ण कोठारे कुटुंबाकडून भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असं आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी म्हटलं आहे. वृद्धापकाळात सरोज कठारे यांचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. महेश कोठारे यांना मातृशोक झाल्याचं कळताच मराठी सिनेसृष्टी आणि सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी कोठारे यांना फोन करून त्यांचं सांत्वन केलं.

आधी वडील गेले

आईच्या जाण्याने अवघ्या सहा महिन्यातच कोठारे कुटुंबावर मोठा आघात कोसळला आहे. जानेवारी महिन्यात महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचं निधन झालं होतं. ते 96 वर्षाचे होते. त्यानंतर काल त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं आहे. त्यामुळे शोक व्यक्त केला जात आहे.

चाहत्यांकडून शोक व्यक्त

आदिनाथ कोठारे याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजीच्या निधनाची माहिती दिली आहे. आदिनाथ याच्या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी आजीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही इन्स्टाग्रामवरून शोक व्यक्त केला आहे. तसेच कठिण प्रसंगात परमेश्वर कोठारे कुटुंबीयांना बळ देवो, अशी प्रार्थनाही केली आहे.

Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....