विठ्ठल उमप यांचा आवाज ऐकून मन्ना डे काय म्हणाले?; वाचा, लोकशाहीराचा किस्सा!

दिवंगत शाहीर विठ्ठल उमप यांचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी त्यांच्या ऐन तारुण्यातील एक किस्सा अतिशय महत्त्वाचा आहे. (manna dey praised lokshahir vitthal umap)

विठ्ठल उमप यांचा आवाज ऐकून मन्ना डे काय म्हणाले?; वाचा, लोकशाहीराचा किस्सा!
लोकशाहीर विठ्ठल उमप
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 4:53 PM

मुंबई: दिवंगत शाहीर विठ्ठल उमप यांचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी त्यांच्या ऐन तारुण्यातील एक किस्सा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यावेळी गायक म्हणून त्यांची जडणघडण सुरू झाली होती. एका कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायक मन्ना डे यांनी दादांचं गाणं ऐकलं आणि मन्नादांच्या तोंडून कौतुकाचे उद्गार निघाले… मन्नादाचे हे उद्गार त्यांच्या काळजावर कायमचे कोरले गेले. त्याचीच ही गोष्ट! (manna dey praised lokshahir vitthal umap)

पाठीवर हात ठेवला अन् मन्ना डे म्हणाले…

1963 मधला हा किस्सा आहे. तेव्हा उमपदादा पोस्टात कामाला होते. पोस्टात त्यावेळी दरवर्षी स्पर्धा व्हायच्या अन् विविध स्पर्धेत प्रथम आलेल्या कलावंताचा नामवंत कलावंताच्या हस्ते सत्कार केला जायचा. त्यावेळी या कलावंतांना पाहुण्यांसमोर आपली अदाकारी पेश करावी लागायची. त्यावर्षीचा कार्यक्रम धोबी तलावच्या बिर्ला मातोश्री रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध पार्श्वगायक मन्ना डे आले होते. दादांनी मन्ना डें समोरच आपली कला सादर केली. आपल्या पहाडी आवाजात त्यांनी खणखणीतपणे गाणं गायलं. त्या दिवशी दादांचा सूरही जोरदार लागला होता. परफॉर्मन्स चांगला झाला. प्रेक्षकांचीही भरभरून दाद मिळाली. सर्वांची अदाकारी झाल्यानंतर सत्कार समारंभ सुरू झाला. दादा येताच मन्ना डे यांनी त्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप मारली. आणि म्हणाले, आप बहोत ऊंचा सूर में गाये है. हमें भी उंचा गाना पडेगा. मन्ना डेंकडून अनपेक्षितपणे मिळालेल्या या कौतुकाच्या थापेमुळे दादा थोडेसे गोंधळून गेले आणि भारावूनही गेले. काय बोलावं हेच त्यांना सूचत नव्हतं. हा किस्सा दादांनी 14 वर्षांपूर्वी ऐकवला. तेव्हा त्यांचे डोळे खूप काही सांगू जात होते.

दादा साक्षात मंगेशकरांच्या घरात

त्यांनी सांगितलेला आणखी एक किस्सा असाच आहे. मंगेशकर घराण्याशी तो संबंधित आहे. मंगेशकर घराणं आणि गाणं हे समीकरण आहे. गाणं म्हणजे मंगेशकर आणि मंगेशकर म्हणजे गाणं इतकं हे घराणं गाण्याशी एकरुप आहे. पण तरीही उषा मंगेशकर यांना लोकसंगीताची ओळख करून घ्यायची होती. तेव्हा दादा एचएमव्हीवर सातत्याने गायचे. फॉर्मात होते. लोकसंगीताचे जाणकार आणि हुकूमत असलेले गायक म्हणून प्रसिद्ध होते. त्यावेळी संगीतकार श्रीनिवास खळे यांनी उषा मंगेशकर यांची लोकसंगीत शिकण्याची इच्छा दादांना बोलून दाखवली. त्यामुळे दादा दोन दिवस उषाताईंच्या घरी गेले आणि त्यांना लोकसंगीताची माहिती दिली.

कॉर्क आर्यलँडमध्ये सन्मान

दादांना अनेक मान-सन्मान मिळाले. अनेकांनी त्यांचं कौतुक केलं. देशातच नव्हे तर सातासमुद्रापलिकडेही त्यांचा सन्मान करण्यात आला. 1983मध्ये कॉर्क आर्यलँडमध्ये आंतरराष्ट्रीय लोकसंगीत, लोकनृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी 25 राष्ट्रांचे कलाकार या महोत्सवात सहभागी झाले होते. त्यात दादांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यामुळे कॉर्क आर्यलँडचे महापौर जॉन माँटेग्यू यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.

इंदिरा गांधींनाही भेटले

दादा कलाकार होते. पण त्यांच्या सामाजिक जाणीवा अत्यंत तीव्र होत्या. त्यांच्या गाण्यातून ते दिसून यायचं. 1969मध्ये तर ते थेट इंदिरा गांधींना भेटले होते. इंदिरा गांधींना भेटून त्यांनी त्यांना मागासवर्गीयांच्या मागण्या सादर केल्या होत्या.

शाहीरी आणि जबाबदाऱ्या

शाहीरी करता करता दादांनी अनेक मोठ्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या. त्यातून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मुंबई विद्यापीठात ते लोककला अकादमीचे सल्लागार होते. नभोवाणीच्या लोकसंगीत विभागाचे परीक्षक होते. केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र बोर्ड आणि भारत सरकारच्या नियोजन आयोगाच्या सांस्कृतिक विभागाचे सभासद होते. महाराष्ट्र सरकारच्या विठाबाई भाऊ नारायणगावकर गौरव समितीचेही ते सभासद होते. (manna dey praised lokshahir vitthal umap)

पुरस्कार… पुरस्कार आणि पुरस्कार…

दादांच्या विक्रोळी येथील घरी तर पुरस्कारांचा खच लागलेला आहे. बघावं तिथे पुरस्कार… पुरस्कार आणि पुरस्कारच दिसतात. एवढा प्रचंड मान सन्मान त्यांना मिळालेला आहे. दलित मित्र पुरस्कार असो, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, दुरदर्शनचा नवरत्न पुरस्कार, पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानचा पुरस्कार, पिंपरीचा कै. शाहीर दादा कोंडके पुरस्कार आदी शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. (manna dey praised lokshahir vitthal umap)

संबंधित बातम्या:

बाप महाराष्ट्राचा स्वर सम्राट, मुलगा सेंच्युरी मिलमध्ये; अशी झाली मिलिंद शिंदेंची जडणघडण

आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?

रेल्वे आणि बस प्रवासातही रियाज करायचे; लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे हे किस्से माहीत आहेत काय?

(manna dey praised lokshahir vitthal umap)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.