मुक्ता बर्वेचा नवा सिनेमा ‘वाय’ 24 जूनपासून प्रदर्शित, कल्पनेपलिकडील वास्तवाची -‘ती’ च्या लढ्याची गोष्ट…

'वाय' या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वेची प्रमुख भूमिका आहे. पोस्टरमध्ये मुक्ताच्या संघर्षपूर्ण डोळ्यांत खंबीरपणे लढण्याची ताकद दिसत असून आजुबाजूला आगीचे लोळ दिसत आहेत.

मुक्ता बर्वेचा नवा सिनेमा 'वाय' 24 जूनपासून प्रदर्शित,  कल्पनेपलिकडील वास्तवाची -'ती' च्या लढ्याची गोष्ट...
मुक्ता बर्वे- 'वाय' चित्रपट Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 8:30 AM

मुंबई : सत्य घटनांवर आधारित ‘वाय’ (Y) हा चित्रपट येत्या 24 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कन्ट्रोल-एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची घोषणा नुकतीच सोशल मीडियावर करण्यात आली आहे. अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वेची (Mukta Barve) प्रमुख भूमिका आहे. पोस्टरमध्ये मुक्ताच्या संघर्षपूर्ण डोळ्यांत खंबीरपणे लढण्याची ताकद दिसत असून आजुबाजूला आगीचे लोळ दिसत आहेत. तर लाल रंगाच्या ‘वाय’ मध्ये ग्लोव्हस घातलेले हात वैद्यकीय हत्यार हाताळताना दिसत आहे. पोस्टरवरून हा चित्रपट महत्वपूर्ण विषयावर भाष्य करणारा दिसतोय.

चित्रपटाच्या ‘वाय’ या शिर्षकाच्या पार्श्वभागी असणाऱ्या WHY या इंग्रजी अक्षरामुळे ही चित्रपटाच्या आशय आणि विषयाबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे. ‘वाय’ एक दमदार कथा आणि आशय घेऊन प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे दिसतेय. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ”सत्य परिस्थिती दाखवणारी, आजच्या काळात घडणारी ही कथा आहे. या भूमिकेसाठी मुक्ता शिवाय दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्रीचा विचार माझ्या मनात नव्हता. मला खात्री आहे, या चित्रपटाला तुम्ही भरपूर प्रतिसाद द्याल.’’

मुक्ता बर्वेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. “घाबरून मागे हटणारी ती नाही .. कल्पनेपलीकडील वास्तवाची .. ती च्या लढ्याची गोष्ट … ‘वाय’ 24 जून पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!”, असं तिने या पोस्टला कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

यंदाच्या महागौरव सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान अभिनेत्री मुक्ता बर्वेने पटकावला. जोगवा या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूरच्या हस्ते मिळाला.त्यावेळी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मुक्ता बर्वे ही मराठी इंडस्ट्रीतील दमदार कलाकारांपैकी एक आहे. ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत तिने उमेश कामतसोबत काम केलं. मुक्ता आणि उमेश हे दोघंही टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी आहेत.

संबंधित बातम्या

Video : अमृता खानविलकरच्या ‘चंद्रामुखी’ची अप्सरेला भुरळ, ‘चंद्रा’ गाण्यावर सोनाली कुलकर्णी थिरकली

Mulgi Jhali Ho: अजय पूरकर यांनी ‘मुलगी झाली हो’ मालिकेचा घेतला निरोप

‘तुझ्या माझ्या संसाराला..’मध्ये रेवाच्या एण्ट्रीमुळे सिड-अदितीमध्ये रंगणार चुरस

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.