माझं ठरलंय, या मी गोष्टी कधीच करणार नाही; प्राजक्ता माळीचं मत तुम्हाला पटेल
Prajkta Mali about Phullwanti Movie : अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'फुलवंती' हा प्राजक्ताचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्राजक्ताने मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. वाचा...
अभिनेत्री प्राजक्ता माळी विविध मुद्द्यांवर बिंधास बोलते. प्राजक्ताने एका मुलाखतीत तिच्या कामाबद्दल एक मत व्यक्त केलं आहे. माझं ठरलं आहे की, मी लोकांना वेगळ्या मार्गाला नेईल, असं काम करणार नाही. मी दारूची जाहिरात कधी करणार नाही. सिगारेट, तंबाखूची जाहिरात करणार नाही. रमी, ऑनलाईन गेम्स् याच्या जाहिराती करणार नाही, असं माझं ठरलं आहे. चुकीच्या गोष्टींची जाहिरात करणार नाही, त्यातून पैसा कमावणार नाही, असं मी स्वत:शी पक्क केलं आहे. मध्यंतरी मला अशा ऑफर आल्या. मला ज्या कामातून बरं वाटणार आहे. त्यातूनच मी पैसा कमवेन, असं प्राजक्ता म्हणाली.
प्राजक्ता काय म्हणाली?
वाईट गोष्टींमधून मी पैसे कमावणार नाही. माझ्या कामातून मी पैसा कमावेन. ‘प्राजक्तराज’ या ज्वेलरी ब्रँडमधून मी पैसे कमवेन. लोकांचं मी देणं लागते. मी ‘प्राजक्तराज’मधून परंपरा पण जपतेय आणि पैसे पण कमावतेय. लोकांचं मनोरंजन करतेय त्यातून मी पैसे कमावतेय. चुकीच्या गोष्टीतून पैसा कमावणं मला मान्य नाही. मग ते पैसे मला कमी मिळाले तरी चालतील, असं मत प्राजक्ता माळी हिने एका मुलाखतीत मांडलं आहे.
कामाच्या शिस्तीबाबत प्राजक्ता म्हणाली…
मला कामाच्या शिस्तीत राहून काम करायला आवडतं. मी जिथं कुठं काम करत असते तिथं मला वेळेवर पोहोचायला आवडतं. हे माझ्यादृष्टीने कामाची शिस्त आहे. आता महाराष्ट्राची हास्य जत्राचं उदाहरण दिलं, तर मला माहिती असतं की आमचा कॉल टाईम 12 चा आहे. पण आमचं शूटिंग 5 नंतर सुरु होतं. तर मी तिथं सांगते की, मी दोन वाजता येते. हे मी सांगून करते, असं प्राजक्ताने म्हटलं.
जितका वेळ कामाच्या ठिकाणी आहे तिथं मी 110 टक्के देत असते. पुढे कितीही काहीही सुरु असेल तरी मी माझं बेस्ट देते. कारण मला त्या कामासाठीच तिथं बोलावलं गेलं आहे. कधी- कधी असं होतं की स्किट्स नाही आवडत. पण मग अशावेळी मी खूप इन्जॉय नसेल करत तरी मी तिथं उत्साहात असते. तुम्ही किती हसताय, तुमच्या आजूबाजूचं वातावरण किती आनंदी आहे, यावरून मी यशाची व्याख्या करते, असं प्राजक्ताने सांगितलं.