‘पेट पुराण’चा ट्रेलर रिलीज, सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची केमेस्ट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
पेट पुराण' आधुनिक काळातील श्रमजीवी जोडप्याच्या मानसिकता व प्राध्यानक्रमामधील संघर्षाना दाखवते. या जोडप्याची मुले व कुटुंब नसण्याची इच्छा आहे आणि परिपूर्ण कुटुंबाप्रती त्यांचा अपारंपारिक व आगळावेगळा दृष्टीकोन आहे.
मुंबई : ‘पेट पुराण’ (pet puran movie) आधुनिक काळातील श्रमजीवी जोडप्याच्या मानसिकता व प्राध्यानक्रमामधील संघर्षाना दाखवते. या जोडप्याची मुले व कुटुंब नसण्याची इच्छा आहे आणि परिपूर्ण कुटुंबाप्रती त्यांचा अपारंपारिक व आगळावेगळा दृष्टीकोन आहे. त्यांची कुटुंबं आणि समाजाची त्यांच्या या अपारंपारिक निवडीप्रती काय प्रतिक्रिया असेल? अधिक जाणण्यासाठी तुम्ही ट्रेलर पाहू शकता… जो नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात सई ताम्हणकर (sai tamhankar) आणि ललित प्रभाकर (Lalit prabhakar) एकत्र पाहायला मिळणार आहेत.
View this post on Instagram
सोनी लिव्हवर 6 मे पासून सुरू होणाऱ्या या शोमध्ये अदितीच्या भूमिकेत सई ताम्हणकर आणि अतुलच्या भूमिकेत ललित प्रभाकर आहे. “पेट पुराण”ची निर्मिती व लेखन दिग्दर्शक ज्ञानेश जोटिंग यांनी केले आहे आणि ह्यूज प्रॉडक्शन्सचे रणजित गुगले हे या शोचे निर्माते आहेत. #पेटपुराण मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्ये पाहता येईल.
View this post on Instagram
सईचा नुकताच पाँडीचेरी हा सिनेमा प्रदर्शित झाला. पाँडीचेरीसारख्या सुंदर निसर्गरम्य शहरात घडणारी मराठी माणसाची गोष्ट आहे. नवीन पिढीच्या नात्याचे प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा असून विस्थापित झालेले लोक कोणत्या पध्दतीची नाती निर्माण करतात, यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. एकंदरच नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात सई, वैभव आणि अमृता यांच्या भूमिका पाहायला मिळाल्या. या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिला चित्रपट आहे, जो संपूर्ण स्मार्ट फोनवर चित्रित करण्यात आला आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत या चित्रपटासाठी सचिन कुंडलकर यांनी तिहेरी भूमिका साकारली आहे, दिग्दर्शनासोबतच त्यांनी लेखनाची आणि निर्मात्याची धुराही सांभाळली आहे. याव्यतिरिक्त नील पटेलही या चित्रपटाचे निर्माते आहेत. मोह माया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट मोबआल फोनवर शूट करण्यात आला होता.
ललित पर्भाकरची ‘शांतीत क्रांती’ ही पहिली वेब सिरीज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. ही तीन मित्रांमधील मैत्रीच्या प्रवासाची गोष्ट आहे. प्रत्येकालाच आयुष्यात शांतता हवी असते आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. ती शांतता मिळण्यासाठी आपण काय करू शकतो, हे सांगण्याचा या सिनेमाच्या माध्यमनातून प्रयत्न करण्यात आला आहे. ललितने यात प्रसन्न नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.
संबंधित बातम्या