‘ये शारुक, मयतीला आलोय, काढ ते ढापण’, सैराटमधल्या लंगड्यापासून ते बाळासायबांपर्यंतचं ‘भिरकीट’, टीझर तर पाहायलाच हवा!
मुंबई : प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडवायला येत्या 17 जूनपासून ‘भिरकीट’ (Bhirkit) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्लासिक एंटरप्राईज प्रस्तुत, सुरेश जमतराज ओसवाल व भाग्यवंती सुरेश ओसवाल निर्मित ‘भिरकीट’चे काही दिवसांपूर्वीच एक मजेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पोस्टरवरून चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यातच आता चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनुप जगदाळे दिग्दर्शित या […]
मुंबई : प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडवायला येत्या 17 जूनपासून ‘भिरकीट’ (Bhirkit) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्लासिक एंटरप्राईज प्रस्तुत, सुरेश जमतराज ओसवाल व भाग्यवंती सुरेश ओसवाल निर्मित ‘भिरकीट’चे काही दिवसांपूर्वीच एक मजेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पोस्टरवरून चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यातच आता चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनुप जगदाळे दिग्दर्शित या चित्रपटात गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni), ऋषिकेश जोशी, मोनालीसा बागुल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांचा हास्यकल्लोळ पाहायला मिळणार आहे.
पैसा कमावण्याचे, प्रसिद्धीचे, सुखी राहाण्याचे ‘भिरकीट’ सगळ्यांच्या मागे असताना ‘तात्या’ मात्र वेगळ्याच दुनियेत जगत आहे. त्याच्या या दुनियेत नेमके काय होते आणि त्यातून तो बाहेर येतो का, हे ‘भिरकीट’ पाहिल्यावरच कळेल. हा एक धमाल विनोदी आणि कौटुंबिक चित्रपट असल्याचे कळतेय.
‘भिरकीट’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात, ” मुळात ‘भिरकीट’ म्हणजे काय? चित्रपटाचे नावच प्रशचिन्ह उपस्थित करणारे आहे. ‘भिरकीट’ हे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अदृश्यरिता मागे लागलेले असतेच. मुळात ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. टिझरवरून कळले असेलच माणूस ‘माणूस’ म्हणून किती उरलेला आहे. त्याच्यात किती बदल झाला आहे. हे सर्व ‘भिरकीट’मध्ये पाहायला मिळणार आहे. हा एक मल्टीस्टारर सिनेमा आहेत. अर्थात ती कथेची गरज होती. मात्र यात सगळे कसलेले कलाकार आहेत. ‘देऊळ’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गिरीश कुलकर्णी यात तात्याच्या भूमिकेत आहेत. यापूर्वी आपण वळू, विहीर, गाभ्रीचा पाऊस, जाऊद्याना बाळासाहेब, फास्टर फेणे अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिलेला आहे. बॅालिवूडच्या चित्रपटांमध्येही त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘भिरकीट’मध्ये आता ते पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.’’
‘भिरकीट’ची पटकथा व संवाद प्रताप गंगावणे यांचे असून हा एक जबरदस्त विनोदी चित्रपट आहे. शैल व प्रितेश या हिंदी जोडीचे ‘भिरकीट’ला संगीत लाभले आहे.