AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘विजयी भव’ प्रदर्शनासाठी सज्ज, चित्रपट 20 मेला प्रदर्शित होणार

स्वास्तिक मोशन पिक्चर्स प्रोडक्शनची निर्मिती आणि केनिल एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या 'विजयी भव' या आगामी मराठी चित्रपटाची निर्मिती किर्तन गोर्धनभाई पटेल आणि जगदीश एम. पवार यांनी केली आहे. दिग्दर्शन शैलेश पटेल आणि अतुल सोनार या जोडगोळीनं केलं आहे.

Video : 'विजयी भव' प्रदर्शनासाठी सज्ज, चित्रपट 20 मेला प्रदर्शित होणार
| Updated on: May 13, 2022 | 3:43 PM
Share

मुंबई : आजवर राजकारण आणि खेळावर आधारलेले बरेच सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. काहींमध्ये केवळ खेळ होता, तर काहींमध्ये फक्त राजकारण… आता मात्र एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यात राजकारण आणि खेळ यांची अचूक सांगड घालण्यात आली आहे. ‘विजयी भव’ (Vijayi Bhav Movie) हा चित्रपट मागील काही दिवसांपासून रसिकांपासून सिनेसृष्टीपर्यंत सर्वत्र चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘विजयी भव’च्या ट्रेलरनं (Vijayi Bhav Trailer) रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचवण्याचं काम केलं आहे. अत्यंत कमी वेळेत ‘विजयी भव’चा ट्रेलर हजारो रसिकांपर्यंत पोहोचला आहे. या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याची प्रतीक्षा संपली असून, 20 मे रोजी ‘विजयी भव’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

स्वास्तिक मोशन पिक्चर्स प्रोडक्शनची निर्मिती आणि केनिल एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘विजयी भव’ या आगामी मराठी चित्रपटाची निर्मिती किर्तन गोर्धनभाई पटेल आणि जगदीश एम. पवार यांनी केली आहे. दिग्दर्शन शैलेश पटेल आणि अतुल सोनार या जोडगोळीनं केलं आहे. आजवर बऱ्याच दिग्दर्शकांनी जोडीच्या रूपात यश मिळवल्यानंतर शैलेश-अतुल ही नवी जोडी ‘विजयी भव’च्या माध्यमातून प्रेक्षकांवर मोहिनी घालणार आहे.

चित्रपटाची कथा पळसखेडा गावाभोवती गुंफण्यात आली आहे. या गावात दर पाच वर्षांनी नवीन सरपंचांची निवड करण्यासाठी कबड्डी सामने खेळवले जातात. सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या ज्या उमेदवाराचा संघ विजयी होतो त्याच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडते. राजकारण म्हटलं की डावपेच, कपट, सूडभावना, चित-पट, गनिमी कावे, हेवे-दावे हे आलेच. याच राजकारणाची सांगड कबड्डीसारख्या अस्सल लाल मातीतील खेळाशी घालण्यात आली आहे.

खेळातील खिलाडूवृत्ती राजकारणावर विजय मिळवण्यात यशस्वी होते का ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे. आजच्या काळात बनणाऱ्या चित्रपटांपेक्षा वेगळं कथानक हे ‘विजयी भव’चं प्लस पॅाईंट आहे. कथानकाला साजेशा प्रसंगांची गुंफण आणि प्रसंगानुरूप संवादलेखन काही ठिकाणी प्रेक्षकांना हसवेल, तर काही ठिकाणी अंर्तमुख होऊन विचार करायला लावेल. सुमधूर गीत-संगीत आणि नयनरम्य लोकेशन्सवर करण्यात आलेलं चित्रीकरण हे ‘विजयी भव’चं आणखी एक वैशिष्टय आहे. राजकारणाच्या पटलावर कबड्डीचा डाव सादर करताना अनाहुतपणे उलगडत जाणारे कथानकातील विविध पैलू रसिकांना क्लायमॅक्सपर्यंत खिळवून ठेवतील.

‘विजयी भव’ची कथा जगदीश पवार यांनी लिहिली असून, पटकथालेखन अतुल सोनार यांनी केलं आहे. मुकुंद महाले यांनी अतुल सोनार यांच्यासोबत मिळून संवादलेखन केलं आहे. इंडियन आयडॅाल फेम जगदीश चव्हाण ‘विजयी भव’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार असून, त्यानं गाणंही गायलं आहे. त्यामुळं जगदीशची अभिनेता आणि गायक अशी दुहेरी भूमिका प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यात पूजा जैसवालसोबत जगदीशची जोडी जमली असल्यानं नव्या जोडीच्या केमिस्ट्रीचीही अनुभवायला मिळेल. सोनाली दळवीने यात दामिनीचे पात्र साकारले असून ती यात एका धडाकेबाज भूमिकेत दिसणार आहे.

विनायक केतकर, जगदीश पवार, विक्रम मेहता आदी कलाकारही आहेत. डिओपी लालजी बेलदार यांची सिनेमॅटोग्राफी, विक्रांत देव, नॅाडी रसाळ, राम देवन, दीपक तुरी यांची कोरिओग्राफी, धर्मेश चांचडीया यांचं संकलन, स्वप्नील नंगी यांचं पार्श्वसंगीत, विरेंद्र रत्ने यांचं गीतलेखन, कबीर शाक्या यांचं संगीत आणि जगदीश चव्हाण, कविता राम, मंजिमा गोस्वामी, वैशाली माडे, नूरा सिंग आडे, स्वप्नाली चौहान यांच्या सुमधूर आवाजातील गाणी यात आहेत. कॅास्च्युम डिझाईन कश्मीरानं, तर साऊंड डिझाईंनींग हमजा दागीनावाला यांनी केलं आहे. किशोर संगानी आणि सुरेश पाटील प्रोडक्शन मॅनेजर्स आहेत. संपत आणि अश्विन कार्यकारी निर्माते असलेल्या या चित्रपटासाठी फाईट मास्टर परवेझ आणि शहाबुद्दीन यांनी फाईटींग सिक्वेन्स केले आहेत. 20 मे रोजी ‘विजयी भव’ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.