Mukta Barve: ‘आता झोप उडणार’, कल्पनेपलिकडील वास्तवाची गोष्ट सांगणाऱ्या ‘वाय’चा टीझर पाहिलात का?

| Updated on: May 30, 2022 | 2:03 PM

'आता झोप उडणार, आज तिची वेळ, आणि उद्या कदाचित तुमची...सावध रहा,' असं कॅप्शन देत मुक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा उत्कंठावर्धक टीझर शेअर केला आहे. 

Mukta Barve: आता झोप उडणार, कल्पनेपलिकडील वास्तवाची गोष्ट सांगणाऱ्या वायचा टीझर पाहिलात का?
Y movie
Image Credit source: Youtube
Follow us on

अभिनेत्री मुक्ता बर्वेनं (Mukta Barve) हातात मशाल धरलेला ‘वाय’ (Y) या चित्रपटाचा आगळावेगळा पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. मशाल घेऊन नक्की ती कोणासोबत लढत आहे याचे अंदाज अजूनही लावले जात आहेत. आता ‘वाय’ चित्रपटाचा टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजित सूर्यकांत वाडीकर (Ajit Wadikar) दिग्दर्शित ‘वाय’ हा चित्रपट येत्या 24 जून रोजी प्रदर्शित होत आहे. अतिशय थरारक अशा या टीझरमध्ये झोपेतून अचानक जागे झालेल्या मुक्ताच्या दिशेने एक अक्राळविक्राळ कुत्रा गुरगुरत झेपावताना दिसत आहे. हा कुत्रा मुक्ताकडे का झेपावत आहे, नक्की काय घडतंय, कशासाठी घडतंय, या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर कळणार आहेत.

‘आता झोप उडणार, आज तिची वेळ, आणि उद्या कदाचित तुमची…सावध रहा,’ असं कॅप्शन देत मुक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा उत्कंठावर्धक टीझर शेअर केला आहे. चित्रपटाच्या उत्कंठापूर्ण प्रमोशनची आणि ‘वाय’ या शिर्षकाची चर्चा सर्वत्र सुरू असताना या टीझरने कुतुहलात आणखी भर पडली आहे. दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, “वाय या शिर्षकामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. वाय ही आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी आहे. या टीझरचा आणि ‘वाय’ या नावाचा अर्थ तुम्हा सर्वांना जाणून घ्यायचा आहेच आणि त्यासाठी ‘वाय’ नक्की म्हणजे नक्की पहा.”

हे सुद्धा वाचा

मुक्ता बर्वेची पोस्ट-

कंट्रोल एन प्रॉडक्शन्स निर्मित चित्रपटाची कथा अजित सूर्यकांत वाडीकर यांची असून पटकथा व संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.