अडीच महिने घरात लाईट…; तेजस्विनी पंडीतने सांगितला संघर्षाकाळातील प्रसंग
Actress Tejaswini Pandit Ask About Her Stuggle : अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने तिच्या संघर्षाच्या काळाबाबत भाष्य केलं आहे. तिने एका मुलाखती दरम्यान एक प्रसंग सांगितला. तो प्रसंग नेमका काय आहे? तेजस्विनी पंडीतने त्या मुलाखतीदरम्यान काय सांगितलं? वाचा सविस्तर...
सिनेमांमधील कलाकारांना पाहिलं की, त्यांचं जीवन प्रचंड अलिशान असेल. त्यांचं जीवन प्रचंड सुखी असेल. कोणत्याही अडचणी नसतील, असा ग्रह प्रेक्षकांचा होतो. पण वास्तवात या कलाकारांनाही प्रचंड मेहनत करावी लागते. शिवाय त्यांनाही कठीण काळाचा, संघर्षाचा सामना करावा लागतो. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्धी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने तिच्या आयुष्यातील खडतर प्रसंगाविषयी एका मुलाखती दरम्यान भाष्य केलं. तिच्या या प्रसंगाविषयी तेजस्वीनी बोलती झाली.
तेजस्विनी ‘त्या’ प्रसंगावर व्यक्त
करिअरच्या सुरुवातीच्या काळात तेजस्विनीला संघर्ष करावा लागला. याबाबत तेजस्विनीने सांगितलं. अडीच महिने घरात लाईट नव्हती. लाईटबिल भरलं नाही म्हणून लाईट बंद केली होती. तो काळ माझ्यासाठी प्रचंड खडतर होता. त्यावेळी मी एक जाहीरात केली. त्या जाहीरातीचे मला चांगले पैसे आले. ते पैसे आले की सगळ्यात आधी मी घराचं लाईट बिल भरलं. तेव्हा घरात लाईट आली. ज्या दिवशी घरात लाईट आली तो दिवस मी विसरू शकत नाही. मी प्रचंड आनंदी झाले. समाधानी झाले, असं तेजस्विनी म्हणाली.
घरात लाईट नसते तेव्हा…; तेजस्विनी काय म्हणाली?
एका अभिनेत्रीच्या घरात लाईट नसते. तेव्हा लोक तिच्याकडे कोणत्या नजरेने बघतात. तुमच्या परिस्थितीकडे कसं बघतात. हे मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत, असं तेजस्विनी पंडीत एका मुलाखतीत म्हणाली. हा प्रसंग सांगताना तेजस्विनीचे डोळे पाणावले होते.
हा प्रसंग घडला तेव्हा माझं कळतं वय नव्हतं. पण लाईट आल्यावर मला वाटलं की आपण फार मॅच्युअर झालो आहोत. खडतर परिस्थितीवर मात करण्यासाठीची पहिलं पाऊल आपण उचललं आहे. खूप बरं वाटलं. त्यानंतर मी थांबले नाही. मी काम करत गेले. लोकांचं प्रेम मिळत गेलं. त्यामुळे आज मी इथे आहे, असं तेजस्विनी म्हणाली.
तेजस्विनी पंडीत ही मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तू ही रे या सिनेमातील तिचं काम प्रेक्षकांना प्रचंड भावलं. शिवाय अनुराधा या सिरीजमधली तिची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली.