Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझे पती बॉलिवूडला टार्गेट करत नाहीयत’, समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ पुढे आली पत्नी क्रांती रेडकर!

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. ते फिल्मी जगतातील विशेषतः बॉलिवूडच्या लोकांना टार्गेट करत असल्याचं बोललं जात आहे.

‘माझे पती बॉलिवूडला टार्गेट करत नाहीयत’, समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ पुढे आली पत्नी क्रांती रेडकर!
Kranti-Sameer
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 12:46 PM

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. ते फिल्मी जगतातील विशेषतः बॉलिवूडच्या लोकांना टार्गेट करत असल्याचं बोललं जात आहे. आता समीर वानखेडेची पत्नी-अभिनेत्री क्रांती रेडकर आपल्या पतीच्या समर्थनार्थ पुढे आली असून, तिने त्यांना पाठींबा देत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक आणि प्रभाकर साईलने समीर यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

इंडिया टुडेसोबतच्या खास संवादात समीर बॉलिवूडवर टार्गेट करत आहेत का? असा प्रश्न क्रांतीला विचारला असता, ती म्हणाली की, ते बॉलिवूडला टार्गेट करत नाहीयेत. ऑपरेशनसाठी ते दर महिन्याला गोव्याला जातात. गोव्यात सेलिब्रिटी नाहीत. तो गुन्हेगारांनाच पकडतो.

क्रांती पुढे म्हणाली की, एका व्यक्तीला या प्रकरणात रस असताना हे सर्व का होत आहे. इतर कोणत्याही प्रकरणात, समीरवर कधीही आरोप करण्यात आले नाहीत. त्यांच्या 15 वर्षांच्या सेवेत त्यांच्यावर प्रथमच असे आरोप लावण्यात आले आहेत.

समीरबद्दल सांगितली ‘ही’ गोष्ट

समीर वानखेडेंवरील खंडणीच्या प्रकरणावर क्रांती म्हणाली की, समीर यांनी कधीही त्यांच्याविरुद्ध तपास नाकारला नाही. त्यासाठी ते नेहमीच तयार असतात. ते चुकीचे आहेत असे तुम्हाला वाटत असेल, तर त्याचा पुरावा आणा. त्यांच्याकडे पैसे कुठून आले ते दाखवा. तुमच्याकडे काही फोन चॅट आहे का, कोणतेही स्टिंग ऑपरेशन आहे, ज्यात त्यांनी म्हटलेय की, मला 8 कोटी रुपये किंवा 18 कोटी रुपये किंवा 25 कोटी रुपये हवे आहेत? रक्त आणि घाम वाहून देशसेवा करणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्याचा हा अपमान आहे.

कुटुंब कधीच दुबईला गेले नाही!

क्रांतीला कुटुंबाच्या परदेश दौऱ्यांबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, मी कधीही दुबईला गेलेले नाही, जो आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तिने सांगितले की, हो, मी, समीर आणि मुले मालदीवच्या सहलीला गेले होतो. आम्ही जिथे थांबलो होतो तिथे कोणीही सेलिब्रिटी नव्हते. तिथे फक्त आम्ही आणि काही सामान्य लोक होते.

ती पुढे म्हणाले की, कोणाला काही जाणून घ्यायचे असेल तर न्यायालयात जा आणि त्यांना काय पहायचे आहे ते मागवा. ट्विटर, इन्स्टाग्रामवर या सर्व गोष्टी करू नका. सोशल मीडिया हे कुणालाही ग्रिल करण्याचे व्यासपीठ नाही.

हेही वाचा :

Aryan Khan Drugs Case | कोकेनचे आश्वासन, 80 हजारांचा गांजा!, आर्यन-अनन्याच्या चॅटमधून नवा खुलासा

Aryan Khan Case LIVE | आर्यन खानला जेल की बेल? 57व्या क्रमांकावर आर्यनची याचिका, काही वेळात सुरु होणार सुनावणी!

Aryan Khan Drug Case : आधी शाहरुख, आता गौरी खान लेक आर्यनला भेटायला आर्थर रोड जेलमध्ये!

Happy Birthday Sussane Khan | पहिल्याच नजरेत सुझान खानच्या प्रेमात पडला होता हृतिक रोशन, पहिल्या डेटचं बिल देखील सुझानच्या नावावर!

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.