AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तमाशा लाईव्ह’मधील ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; मराठी सिनेसृष्टीला मानाचा मुजरा

संजय जाधव (Sanjay Jadhav) दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, पुष्कर जोग, भरत जाधव, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे यांच्या भूमिका आहेत.

'तमाशा लाईव्ह'मधील 'चित्रपटाची नांदी' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; मराठी सिनेसृष्टीला मानाचा मुजरा
Tamasha LiveImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 4:53 PM

काही महिन्यांपूर्वी बिग बजेट फिल्म ‘तमाशा लाईव्ह’चे (Tamasha Live) पोस्टर झळकले होते. या पोस्टरमधील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) जबरदस्त लूक बघून अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. आता या चित्रपटातील एक एक गोष्टी गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या असून ‘तमाशा लाईव्ह’मधील ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जयंतीचे निमित्त साधून हे गाणे भव्यदिव्य स्वरूपात कर्जत येथील एन डी स्टुडिओ (N D Studio) येथे प्रदर्शित करण्यात आले. 100 फूट व्यासपीठावर नृत्याचे आद्यदैवत नटराजाला नमन करून ‘चित्रपटाची नांदी’ची सुरुवात झाली. यावेळी संजय जाधव, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, आयुषी भावे, मनमीत पेम, अमितराज, पंकज पडघन, क्षितीज पटवर्धन यांनी आपल्या मराठी संस्कृतीला साजेसा असा पारंपरिक वेष परिधान करून सिनेमा घडवणाऱ्या सर्व कलाकारांना, तंत्रज्ञांना, एकंदरच पडद्यामागे मेहनत घेणाऱ्या सर्वांनाच मानाचा मुजरा केला.

प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत प्रदर्शित झालेल्या या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभले असून पंकज पडघन यांनी संगीत दिले आहे. सिनेसृष्टीतील वेगवेगळ्या विभागात अमूल्य योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान या गाण्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या गाण्याची खासियत म्हणजे शौनक अभिषेकी, आनंद भाटे, राहुल देशपांडे आणि अनुराधा कुबेर असे शास्रीय संगीतातील नामवंत गायक यानिमित्ताने एकत्र आले आहेत. त्यामुळे संगीतप्रेमींसाठी हा एक संगीत नजराणाच आहे. तसेच या खास दिनाचे औचित्य साधत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट 24 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

प्लॅनेट मराठी आणि माऊली प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली असून सौम्या विळेकर, डॅा. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, पुष्कर जोग, भरत जाधव, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे यांच्या भूमिका आहेत. संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांनी लिहिली असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. तर या चित्रपटाला अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभले असून क्षितिज पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत. हा एक संगीतमय चित्रपट असून यात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

सोनाली कुलकर्णी ‘तमाशा लाईव्ह’विषयी म्हणते, ” आज इतक्या प्रेक्षकांसमोर ‘चित्रपटाची नांदी’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. पडद्यावर चित्रपट पाहताना जितका सोप्पा वाटतो. तितकाच आव्हानात्मक आणि कठीण तो पडद्यामागे असतो. पडद्यावर कलाकारांचे चेहरे दिसतात. परंतु पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत कधीच दिसत नाहीत. आज या गाण्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांचाच सन्मान करत आहोत. ज्यांच्यामुळे चित्रपट घडतो अशा सर्वांना आमच्याकडून मानाचा मुजरा. आजच्या या शुभदिनी चित्रपट प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या चित्रपटाची भव्यता लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.”

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.