‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ शुक्रवारी चित्रपटगृहांत! पोस्टर आणि धमाकेदार ट्रेलरने वाढवली उत्सुकता…
समाजातील वास्तववादी घटनांचे दर्शन घडवण्यात अग्रेसर असणाऱ्या निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपटाद्वारे सत्य परिस्थिती मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज चहूबाजूला मांजरेकरांच्या 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या आगामी मराठी चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई : समाजातील वास्तववादी घटनांचे दर्शन घडवण्यात अग्रेसर असणाऱ्या निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपटाद्वारे सत्य परिस्थिती मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज चहूबाजूला मांजरेकरांच्या ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha) या आगामी मराठी चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. शीर्षकापासून लुकपर्यंत सर्वच बाबतीत मराठीपासून हिंदी सिनेसृष्टीपर्यंत सर्वच ठिकाणी हा चित्रपट चर्चेत आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या टायटलला कुतूहल जागवणाऱ्या मोशन पोस्टरची जोड दिल्यानंतर आता ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चं नवं पोस्टर आणि धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, यात वास्तववादी चेहऱ्यांचं दर्शन घडत आहे. पुढील शुक्रवारी 14 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
नुकतंच रिलीज करण्यात आलेलं ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचं नवं पोस्टर चित्रपटातील विविध व्यक्तिरेखांचं दर्शन घडवणारं आहे. हे पोस्टर चित्रपटातील काळ आणि वातावरणाची झलक दाखवणारं आहे. ‘काँक्रिटच्या जंगलातील उद्ध्वस्त अस्तित्व’ ही पोस्टरवरील टॅगलाईन दाहकतेची जाणीव करून देणारी आहे. विविध वयोगटातील चेहरे ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’च्या पोस्टरवर पहायला मिळतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या मनातील वेदना आणि विचार सांगण्यासाठी पुरेसे आहेत.
पाहा ट्रेलर :
For Twitter
मुंबईच्या जंगलातला हा धूर कुणाला सुखासुखी जगून नाय द्यायचा.. सगळ्यांची वाट लागणार..!
काँक्रीटच्या जंगलातलं वास्तव.. पहा ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपटाचा ट्रेलर..!
पहा ट्रेलर इथे : https://t.co/Js5wbRbqiD
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) January 8, 2022
या चित्रपटातील काळ जवळपास तीन दशकांपूर्वीचा आहे. त्या काळी झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाचा, संपकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर झालेला भीषण परिणाम, त्यांची विदारक परिस्थिती, त्यांनी सहन केलेल्या वेदना, संपामुळं पूर्णत: वाताहत झालेली पिढी आणि त्याचे समाजात उमटलेले पडसाद ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ मध्ये पहायला मिळणार आहेत. पोस्टरवर दिसणारे सर्व चेहरे त्या भीषण परिस्थितीचं वास्तव दाखवणारे आहेतच, पण त्यासोबतच तीन पिढ्यांचं प्रतिनिधीत्वही करणारे आहेत.
पाहा पोस्टर :
माणसाच्या मुखवट्यामागं लपली आहेत जनावरं.. काँक्रीटच्या जंगलात माणुसकीचे लचके तोडायला येत आहे..
नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा!
शिकार सुरू १४ जानेवारीपासून..!#नायवरनभातलोन्चाकोननायकोन्चा #NVBLKNK #14January #InCinemas #NHStudioz #MaheshManjrekar #99Production pic.twitter.com/faVetWJ9XR
— Mahesh Manjrekar (@manjrekarmahesh) January 7, 2022
‘अठरा वर्षांवरील प्रेक्षकहो, दम असेल तरच थेटरात येऊन बघायचं…’ ही पोस्टरवरील ओळही लक्ष वेधून घेते. प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर, ईशा दिवेकर आदी कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.
गिरणी कामगारांची जगण्याची धडपड!
गिरणी कामगारांच्या संपानंतर जगण्यासाठीची धडपड, हार न मानण्याचा मराठी बाणा, त्या वेळेचं ज्वलंत चित्र आणि ज्येष्ठ लेखक जयंत पवार यांच्या धारदार लेखनशैलीद्वारे कथेमध्ये निर्माण झालेल्या हृदयभेदी नाट्यानं मांजरेकरांना आकर्षित केलं होतं. त्यातून ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाची निर्मीती झाली.
अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती तसेच वितरण करणाऱ्या ‘एन एच स्टुडिओज’ या भारतातल्या अग्रगण्य निर्मिती संस्थेने ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘एन एच स्टुडिओज’ मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हिरावत व श्रेयांस हिरावत यांनी केली असून सहनिर्मिती ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’च्या विजय शिंदे यांनी केली आहे. ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ ला हितेश मोडक यांनी संगीत व पार्श्वसंगीत दिलं आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करण बी. रावत यांनी केली आहे.
हेही वाचा :
‘माझा होशील ना’ फेम अभिनेता विराजस लग्न करतोय ‘बन मस्का फेम’ शिवानीसोबत!
सुsssपर! बॉक्सऑफिसवर कल्ला करणारा पुष्पाचं हिंदी वर्जन OTTवर पुढच्या आठवड्यात रिलीज होतंय?
मला नेहमीच मी न केलेल्याची शिक्षा मिळते, पंकजांचे चिमटे, रोख कुणाकडे?