तुमचा ‘द काश्मीर फाईल्स’ तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रवादीच्या नव्या मागणीनं सरकारची गोची?

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी "छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित सिनेमे टॅक्स फ्री करा", अशी मागणी केली आहे.

तुमचा 'द काश्मीर फाईल्स' तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रवादीच्या नव्या मागणीनं सरकारची गोची?
द काश्मीर फाईल्स, पावनखिंड, बाबासाहेब पाटील-राष्ट्रवादी
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 2:06 PM

मुंबई : सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात ‘द काश्मीर फाईल्स(The Kashmir Files) सिनेमा चर्चेचा विषय ठरलाय. भाजप या चित्रपटाच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. हा काश्मीरी पंडियतांवर झालेल्या अन्यायाचा ज्वलंत इतिहास आहे, असं म्हणत या सिनेमाला टॅक्स फ्री (करमुक्त) करा, अशी मागणी भाजपकडून वारंवार करण्यात येतेय. तर दुसरीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीकडून (NCP) छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) आधारित सिनेमे टॅक्स फ्री करा, अशी मागणी करण्यात आली आहे. “महाराष्ट्राचा जाज्ज्वल्य इतिहास दाखविणाऱ्या चित्रपटांना महाराष्ट्रात करमुक्त करावं. सध्या चित्रपटगृहात सुरु असलेल्या पावनखिंड चित्रपटालाही करमुक्त करावं. तसंच आगामी ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते’ हा सिनेमाही टॅक्स फ्री करा”, अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी केली आहे. भाजपचं ‘द काश्मीर फाईल्स‘ तर आमचे छत्रपती शिवाजी महाराज म्हणत राष्ट्रवादीकडून ही मागणी करण्यात आली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्याच या मागणीमुळे सरकारची गोची होणार का? असा सवाल सध्या विचारला जातोय.

“छत्रपती शिवरायांवर आधारित सिनेमे टॅक्स फ्री करा”

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित सिनेमे टॅक्स फ्री करा अशी मागणी केली आहे. “महाराष्ट्राचा जाज्ज्वल्य इतिहास दाखविणाऱ्या चित्रपटांना महाराष्ट्रात करमुक्त करावे. सध्या चित्रपटगृहात सुरु असलेल्या पावनखिंड चित्रपटालाही करमुक्त करावे. छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र विरोधक या मुद्द्यावर न बोलता, भलत्याच विषयाकडे राज्याचे लक्ष वळवत आहेत, काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन भाजपने अनेक मुद्दे मांडले आहेत. या चित्रपटाचे एकाच दिवशी साधारणता 500 ते 700 शो वाढविण्यात आले , तसेच काश्मीर फाइल्स या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याची मागणी देखील विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे. हे आम्ही राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग कधीही खपून घेणार नाही, जर काश्मीर फाइल्स सिनेमा टॅक्स फ्री करण्याचा घाट विरोधी पक्ष जर करत असेल , तर आत्ता प्रदर्शित झालेला पावनखिंड तसेच नव्याने येऊ पाहणारा सरसेनापती हंबीरराव मोहिते हे देखील सिनेमे टॅक्स फ्री करावेत”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

” जय-भीम किंवा झुंड यासारख्या सिनेमांवर हे विरोधी पक्षातील लोक इथून मागे कधीच काही बोले नाहीत. मग आजच काश्मीर फाईल सारख्या सिनेमांवर चर्चा करून त्यांना काय साध्य करायचा आहे इथून मागे जसा उरी,द ताशकंद, मिशन मंगल, पॅडमॅन, विवेक ओबेराय यांनी केलेला मोदी सिनेमा, आणि आत्ता प्रदर्शित केलेला द काश्मीर फाइल्स या सर्व सिनेमातून या मोदी सरकारला काय साध्य करायचं आहे? असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. लवकरच आम्ही सांस्कृतिक मंत्री तसेच मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे विनंती करणार आहे की पावनखिंड आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सिनेमे टॅक्स फ्री करावे”

“भाजप पदाधिकारी प्रमुख भूमिकेत असताना भाजप पावनखिंडवर का बोलत नाही?”

“भाजपच्या चित्रपट कामगार संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अजय पूरकर हे पावनखिंड सिनेमात महत्वाच्या भूमिकेत असताना भाजप या सिनेमावर का बोलत नाही? पावनखिंड टॅक्स फ्री व्हावा अशी मागणी भाजप का करत नाही?”, असा सवालही बाबासाहेब पाटील यांनी विचारला आहे.

संबंधित बातम्या

Vidya Balan Photos : विद्या बालनचा घायाळ करणारा ग्रीन झेब्रा लूक, पाहा फोटो…

‘द काश्मीर फाइल्स’ तुम्ही पाहा अथवा पाहू नका; पण याचं भान ठेवा, थिएटरमधल्या वर्तनावर जोरदार चर्चा

The Kashmir Files: स्टुडिओत ‘द काश्मीर फाईल्स’वर बोलताना अनुपम खेर, विवेक अग्निहोत्रींचे डोळे पाणावले

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.