महाराष्ट्रात घोंघावणार हास्याचं नवं वादळ, ‘भिरकीट’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत व अनुप जगदाळे दिग्दर्शित 'भिरकीट' या चित्रपटाची निर्मिती सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी केली असून पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत.

महाराष्ट्रात घोंघावणार हास्याचं नवं वादळ, ‘भिरकीट’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला...
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 6:31 PM

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये (Marathi Movie) सध्या ‘भिरकीट’ नावाचे हास्याचे वादळ येत आहे. ‘भिरकीट (Bhirkit Movie) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून हे वादळ 17 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा संगीत सोहळा पार पडला. चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस आल्यानंतर आता चित्रपटाबगद्दलची उत्सुकता वाढवणारा ट्रेलरही भेटीला आहे. ट्रेलरमध्ये आपल्याला तात्या पाहायला मिळत आहे, ज्यांची सगळ्यांच्या मदतीसाठीची धडपड दिसत आहे. त्यात असे काही घडल्याचे दिसतेय की, त्यातून अवघ्या गावाची दृष्टी बदलते. आता अशी कोणती घटना घडते, ज्यातून हा बदल घडतो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. हसवता हसवता मनाला स्पर्शून जाणारा हा चित्रपट आहे.

यात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद, श्रीकांत यादव, मीनल बाळ, शिल्पा ठाकरे, दिप्ती धोत्रे, आर्या घारे, सेवा मोरे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नामदेव मिरकुटे, राधा सागर, अश्विनी बागल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात,” ‘भिरकीट’ ही गावच्या मातीची कथा आहे. राजकारण, कौटुंबिक नाते, प्रेमकहाणी , विनोद हे संपूर्ण रस या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची गाणी तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. तसाच चित्रपटाला देखील असाच भरभरून प्रेक्षक प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे. ‘भिरकीट’चा ट्रेलर आज प्रदर्शित होत आहे.संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे.

क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत व अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ या चित्रपटाची निर्मिती सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी केली असून पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत.या चित्रपटाचे ,छायाचित्रण मीर आणि संकलन फैजल महाडिक यांनी केले आहे. तर या चित्रपटाच्या वितरणाची धुरा युएफओने सांभाळली आहे.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...