Timepass 3: ‘टाइमपास 3’मधील आर्या आंबेकरचं पुन्हा प्रेमात पाडणार ‘लव्हेबल’ गाणं; पहा Video

या गाण्यामध्ये दगडू आणि पालवीमध्ये हळूवार खुलत जाणारं प्रेम पहायला मिळत आहे. प्रेमाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बहरत जाणारं हे गाणे आर्या आंबेकर आणि हर्षवर्धन वावरे यांनी गायलं असून याला अमितराज यांनी संगीत दिलं आहे.

Timepass 3: 'टाइमपास 3'मधील आर्या आंबेकरचं पुन्हा प्रेमात पाडणार ‘लव्हेबल’ गाणं; पहा Video
Timepass 3: 'टाईमपास 3'ने ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’मध्ये रोवला झेंडाImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 8:55 AM

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास 3’ (Timepass 3) हा बहुचर्चित चित्रपट येत्या 29 जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. दगडूचं वेड लावणारं प्रेम याआधी आपण सर्वांनीच पाहिलं आहे. आता पुन्हा एकदा त्याच्या ‘लव्हेबल’ भावना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ‘टाइमपास 3’ मधील ‘लव्हेबल’ हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित झालं असून हे गाणं प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि हृता दुर्गुळे (Hruta Durgule) यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये दगडू आणि पालवीमध्ये हळूवार खुलत जाणारं प्रेम पहायला मिळत आहे. प्रेमाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बहरत जाणारं हे गाणे आर्या आंबेकर आणि हर्षवर्धन वावरे यांनी गायलं असून याला अमितराज यांनी संगीत दिलं आहे. तर क्षितीज पटवर्धन यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे.

या गाण्याबद्दल दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, “काही दिवसांपूर्वीच प्रथमेशचं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आता ह्रता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्यातील नाजूक नात्यावरील ‘लव्हेबल’ गाणं आपल्या भेटीला आलं आहे. यापूर्वीही ‘टाइमपास’च्या दोन्ही चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ‘टाइमपास 3’मधील गाणीही संगीतप्रेमींना नक्कीच आवडतील.”

पहा गाणं-

हे सुद्धा वाचा

या चित्रपटात हृताचा कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे आणि त्याचीच झलक प्रेक्षकांना टीझरमध्ये दाखवण्यात आली. ‘लहानपणी टाईमपास म्हणून झालेल्या लव्हपासून लग्नाच्या लोच्यापर्यंतची स्टोरी सगळ्यांनी पाहिली. पण त्या प्रवासात अजून एक गोष्ट होती. जी सांगायची राहिलीच ना रे,’ अशा संवादाने चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. सुरुवातीला दगडू आणि प्राजक्ताची झलक दाखवल्यानंतर पालवीची धमाकेदार एण्ट्री होते. “आपन पालवी दिनकर पाटील, अशी पालवी जी फुटत नाय, फोडते,” अशा दमदार डायलॉगवर हृताच्या चेहऱ्यावर पडदा उचलण्यात येतो.

2014 मध्ये ‘टाईमपास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. प्रथमेश परब आणि केतकी माटेगावकरने यात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टाईमपास 2’मध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापटने मुख्य भूमिका साकारल्या. या दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन रवी जाधवनेच केलं होतं. आता ‘टाईमपास 3’मध्ये हृता आणि प्रथमेशची नवी जोडी पहायला मिळतेय. या टीझरवर अनेकांनी कमेंट्स करत चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत असल्याचं म्हटलंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.