पुन्हा एकदा लग्नाळू 2.0 चे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य! बॉईज 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘लग्नाळू’ या गाण्यांनी आधीच मराठी पडद्यावर आपली एक छाप उमटवली होती. तरुणांमध्ये तर या गाण्याचे एक वेगळेच वेड आहे.

पुन्हा एकदा लग्नाळू 2.0 चे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य! बॉईज 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 7:15 AM

मुंबई : सगळीकडे धमाल,मस्तीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ‘बॉईज’मधील (Boys 3) ‘लग्नाळू’ या गाण्याचे नवीन व्हर्जन ‘बॉईज 3’ या चित्रपटात पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. नुकत्याच एका भव्य सोहळ्याच्या माध्यमातून ‘लग्नाळू 2.0’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे संगीतकार अवधूत गुप्ते असून मुग्धा कऱ्हाडे हिने आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणे गायले आहे. प्रतीक लाड, पार्थ भालेराव, आणि सुमंत शिंदे यांच्यासोबत विदुला चौगुले (Vaidula Chaugule) हिनेही या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. विदुला एकटीच त्या तिघांवरही भारी पडत असल्याचे यात दिसत आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

‘लग्नाळू’ या गाण्यांनी आधीच मराठी पडद्यावर आपली एक छाप उमटवली होती. तरुणांमध्ये तर या गाण्याचे एक वेगळेच वेड आहे. इतक्या वर्षांनंतरही हे गाणे प्रत्येक रंगमंच हादरवून टाकू शकतो. त्यात त्याचे 2.0 व्हर्जन म्हणजे तर प्रेक्षकांसाठी सोने पे सुहागा. नुकत्याच एका भव्य सोहळ्याच्या माध्यमातून ‘लग्नाळू 2.0’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे संगीतकार अवधूत गुप्ते असून मुग्धा कऱ्हाडे हिने आपल्या ठसकेबाज आवाजात हे गाणे गायले आहे.

या गाण्याबद्दल संगीतकार अवधूत गुप्ते म्हणतात, ” ज्या गाण्याने आधीच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे, त्याचे पुढचे व्हर्जन बनवून प्रेक्षकांना अजून खूश करण्याची ही मोठी संधी माझ्याकडे होती आणि ‘लग्नाळू 2.0’ या गाण्यालाही प्रेक्षक तितकाच भरघोस प्रतिसाद देतील, अशी आशा आहे.”

हे सुद्धा वाचा

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज 3’ चे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. येत्या 16 सप्टेंबर रोजी ‘बॅाईज 3’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. प्रतीक लाड, पार्थ भालेराव, आणि सुमंत शिंदे यांच्यासोबत विदुला चौगुले हिनेही या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला आहे. विदुला एकटीच त्या तिघांवरही भारी पडत असल्याचे यात दिसत आहे. राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.