AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmaveer: ‘धर्मवीर’ची पहिल्या आठवड्यात घसघशीत कमाई; बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू

13 मे रोजी हा चित्रपट (Dharmaveer) तब्बल चारशेहून अधिक चित्रपटगृहे आणि १० हजारांहून अधिक शोज सह प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवले.

Dharmaveer: 'धर्मवीर'ची पहिल्या आठवड्यात घसघशीत कमाई; बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू
DharmaveerImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 9:17 AM

महाराष्ट्रात सध्या ‘धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे’ (Dharmaveer) चित्रपटाचाच बोलबाला आहे. 13 मे रोजी हा चित्रपट तब्बल चारशेहून अधिक चित्रपटगृहे आणि १० हजारांहून अधिक शोज सह प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले. याच दिवशी हिंदीतील मोठ्या निर्मितीसंस्थेचे आणि तगडी स्टारकास्ट असलेले चित्रपट प्रदर्शित झाले होते. तरीही ‘धर्मवीर’च्या कमाईवर त्याचा परिणाम झाला नाही. अगदी पहिल्याच दिवसापासून धर्मवीरची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. ‘धर्मवीर’ने पहिल्याच आठवड्यात 13.87 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलंय. हिंदी सिनेमांना गर्दी करणारे प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातं, पण ‘धर्मवीर’च्या निमित्ताने बॉक्स ऑफिसवरच्या घवघवीत यशाने प्रेक्षक पुन्हा मराठी चित्रपटाकडे येऊ लागल्याचं सुखद चित्र दिसत आहे. अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) साकारलेल्या आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली आहे.

याबद्दल झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख म्हणाले, “मराठी चित्रपटासाठी हा अभिमानाचा दिवस आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 13.87 कोटींची कमाई केली आहे. आपण नेहमी ऐकतो, मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीत पण सिनेमा दर्जेदार असेल तर सिनेमागृहांकडून समोरून विचारणा होते. आम्ही ठरवलं होतं त्यापेक्षा जास्त शोज सध्या सुरु आहेत. सिनेमा चांगला असेल तर प्रेक्षकसुद्धा तो सिनेमा डोक्यावर घेतात आणि याचं उत्तम उदाहरण ‘धर्मवीर’ आहे.” मंगेश देसाई आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या काही दिवसांत लोकप्रियतेचे आणि कमाईचे नवे शिखर गाठेल असा अंदाज सिनेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

प्रवीण तरडे दिग्दर्शित हा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी चारशेहून अधिक थिएटर्समध्ये ‘धर्मवीर’चे 10 हजारांहून अधिक शोज लावले गेले. ठाण्यात तर काही थिएटर्सबाहेरील त्यांच्या कटआऊटला दुग्धाभिषेक केला तर काही ठिकाणी प्रेक्षक बँड बाजा घेऊन वाजत, गाजत, नाचत पोहोचले. ठाणे, कल्याण, बदलापूर, डोंबिवली, पुणे आणि मुंबईतही विविध ठिकाणी हाऊसफुल गर्दी जमवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.