Prashant Damle | अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत दामले यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, तुटलेली नाळ आहे ती परत

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक पार पडलीये. ही निवडणूक गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत होती. प्रशांत दामले यांचा दणदणीत विजय झाला असून त्यांची अध्यक्षपदी निवडही झालीये. यानंतर प्रशांत दामले यांनी मोठे भाष्य केले आहे.

Prashant Damle | अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत दामले यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, तुटलेली नाळ आहे ती परत
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 7:48 PM

मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) पंचवार्षिक निवडणूक पार पडलीये. 2023-2028 ची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समितीची निवडणूकही नुकताच पार पडलीये. विशेष म्हणजे या निवडणूकीत प्रशांत दामले (Prashant Damle) यांचा दणदणीत विजय झाला असून त्यांची अध्यक्षपदी निवडही झालीये. यंदाची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समितीची निवडणूक अत्यंत चर्चेत होती. उपाध्यक्षपदी नरेश गडेकर यांचीही वर्णी लागलीये. इतकेच नाही तर पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर (Bhausaheb Bhoir) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नाट्यगृहाच्या सर्व शाखा आर्थिक सक्षम व्हायला पाहिजेत

2023-2028 ची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समितीच्या निवडणूकीमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर नुकताच प्रशांत दामले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया ही दिली आहे. प्रशांत दामले म्हणाले की, नाट्यगृहाच्या सर्व शाखा आर्थिक सक्षम व्हायला पाहिजे, जी तुटलेली नाळ आहे ती परत जोडली पाहिजे.

विजयाचे श्रेय आमच्या सर्वांचेच आहे 

पुढे प्रशांत दामले म्हणाले की, विजयाचे श्रेय म्हणजे आम्ही सर्व साठजण घट्ट आहोत. त्यामुळे हा आमचा विजय होणारच होता. कुठेही अजिबात दुमत संशय नव्हता. व्यवस्थित विजय मिळालेला आहे. त्यामुळे पुढे चांगले काम करणार आहोत हे नक्कीच. अटीतटीचा सामना नव्हता उदय हे ट्रस्टी म्हणून काम करत आहेत.

राजकीय हस्तक्षेप आहे की नाही हा प्रश्न आहे

प्रशांत दामले म्हणाले, शरद पवार देखील अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. राजकीय हस्तक्षेप आहे की नाही हा प्रश्न आहे. मात्र ते असे नाही राजकारण आणि परिषद याचा कुठलाही संबंध नाहीये. नाट्यगृहासाठी सरकारने काही निधी ठेवला आहे, तो नीट व्यवस्थितपणे करायला लागेल.

रंगकर्मी नाटक समूह गटाचा दणदणीत विजय

नाट्यगृहाच्या सर्व शाखा आर्थिक सक्षम व्हायला पाहिजे जी तुटलेली नाळ आहे ती परत जोडली पाहिजे, असेही म्हणताना प्रशांत दामले हे दिसले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह गटाचा विजय मिळवला होता. ही निवडणूक अत्यंत बहुचर्चित ठरली आहे.

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.