Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टेजवर गाता गाताच बोदडेंना पॅरेलिसिसचा अ‍ॅटॅक आला, ग्रामस्थांकडून पै पै जमा; वाचा, पुढे काय घडलं?

प्रसिद्ध लोकगायक प्रतापसिंग बोदडे यांना गाण्याचे कार्यक्रम करताना अनेक अनुभव आले. (pratapsingh bodade got paralysis attack in akola when he performing on stage)

स्टेजवर गाता गाताच बोदडेंना पॅरेलिसिसचा अ‍ॅटॅक आला, ग्रामस्थांकडून पै पै जमा; वाचा, पुढे काय घडलं?
pratapsingh bodade
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 5:27 PM

मुंबई: प्रसिद्ध लोकगायक प्रतापसिंग बोदडे यांना गाण्याचे कार्यक्रम करताना अनेक अनुभव आले. त्यातील काही अनुभव आपण वाचलेत आहेत. परंतु, अकोल्यातील त्यांचा अनुभव हा वेगळाच होता. वेगळाच होता म्हणजे अगदी त्यांच्या जीवावर बेतणारा होता. मात्र, ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे बोदडेंचा जीव वाचला. त्यांचा पुनर्जन्म झाला. त्यांना नवा जन्म देणारा हा किस्सा वाचाच. (pratapsingh bodade got paralysis attack in akola when he performing on stage)

पॅरेलिसिसचा अ‍ॅटॅक, दोन दिवसात ठणठणीत

1996 मधील ही गोष्ट आहे. अकोल्यातील हिंगणी बुद्रूक येथील भीमटेकडीवर भन्ते धम्मपाल यांच्या विहाराच्या मदतीसाठी भीम-बुद्ध गीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गायिका वैशाली शिंदेंबरोबर त्यांचा सामना सुरू होता. रात्रीचे अडीच वाजले होते. मैफल चांगलीच रंगली होती. अन् अचानक एकच धावपळ उडाली. प्रेक्षकांमध्ये धांदल माजली होती. गाणं बंद झालं होतं. कलावंतांनीही एकच गलका केला होता. प्रतापसिंग बोदडे यांना गाता गाताच पॅरेलिसिसचा अ‍ॅटॅक आला होता. तोंड अचानक वाकडे झाले. शब्द बोबडे वळू लागले. एक हात निकामी झाला आणि बघता बघता शरीराची एक बाजू निकामी झाली. मात्र भन्ते धम्मपाल, कलावंत आणि ग्रामस्थांनी थोडाही वेळ न घालवता बोदडेंना रुग्णालयात दाखल केलं. उपचार सुरू झाला. उपचारासाठी खर्च खूप येणार होता. त्यामुळे ग्रामस्थांनी असेल नसेल तेवढे पैसे काढले. दिवसभरात एकूण 25 ते 30 हजार रुपये जमा झाले. ग्रामस्थांनी उभा केलेला पैसा, डॉक्टरांनी केलेले शर्थीचे प्रयत्न आणि इच्छाशक्ती यामुळे बोदडे अवघ्या दोन दिवसात ठणठणीत बरे झाले. समाजाने केलेल्या या उपकारामुळे तेही भारावून गेले होते.

कव्वाल अब्दूल रफ चाऊस यांची कौतुकाची थाप

जगप्रसिद्ध कव्वाल अब्दूल रफ चाऊस यांच्याबद्दलचा एक किस्साही असाच त्यांच्या स्मरणात आहे. नाशिकच्या पांडव लेण्यांजवळच्या दर्ग्यात अब्दूल रफ चाऊस, राणी रुपलता आणि बोदडे यांचा तिरंगी सामना होता. यावेळी बोदडे यांनी तोडीस तोड कव्वाल्या म्हटल्या. त्यांची शब्द फेक आणि गाण्याची लकब ऐकून चाऊस खूश झाले. कव्वाली सामना संपल्यानंतर त्यांनी बोदडेंना जवळ बोलावले आणि आजतक प्रतापसिंग भाई को मै देखता था, मगर सुना नही था. आज आपका गाना सुनकर मै खूश हूँ. यकीनन प्रतापसिंग भाई आज का चमकता सितारा है और कल का रोशन चाँद बनेगा, ऐसी मै अल्लाताला से दुआ करूंगा, असं म्हणाले. त्यामुळे बोदडे चांगलेच भारावून गेले होते. ही घटना त्यांच्या स्मरणात कायम कोरली गेली आहे.

परदेशात जाण्याची संधी हुकली

बोदडे गेली 50 वर्षे गायनाचे कार्यक्रम करत आहेत. त्यांनी पाच हजाराहून अधिक गाणी लिहिली आणि गायली आहेत. गाण्यांच्या कार्यक्रमासाठी ते वामनदादा कर्डक यांच्यासोबत महाराष्ट्रभर फिरले. एवढेच नव्हे तर मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातही त्यांनी गाण्याचे कार्यक्रम केले. त्यांना अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामध्येही कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं होतं. तिथल्या भावना सोसायटीचे भदन्त विशुद्धानंद यांनी त्यांना पत्र लिहून अमेरिकेत पाचारण केलं होतं. मात्र, नोकरीमुळे त्यांना अमेरिकेत जाता आलं नाही. त्याची खंत त्यांना आजही आहे.

दोन खंत

बोदडेंना आयुष्यभर सतत दोन गोष्टी बोचत आहेत. एक म्हणजे लहानपणी भीक मागून पोट भरावं लागलं आणि दुसरी म्हणजे मुंबईत नोकरीला असल्यामुळे आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराला गावाला जाता आलं नाही. या दोन गोष्टी काळजाला नेहमी डाचणी देत असतात, असं ते सांगतात. (साभार, आंबेडकरी कलावंत) (pratapsingh bodade got paralysis attack in akola when he performing on stage)

संबंधित बातम्या:

गाणं ऐकता ऐकता ‘त्याने’ संपूर्ण पगारच प्रतापसिंग बोदडेंवर उधळला, नंतर काय झालं?, गाणं कोणतं होतं?; वाचाच!

मुलाचं गाणं ऐकून आईही ढसढसा रडली, म्हणाली, ‘बेटा, हे गाणं पुन्हा गाऊ नकोस!’; मन हेलावणारा किस्सा!

‘भीमराज की बेटी मै तो…’ हे गाणं लग्नाच्या मिरवणुकीत वाजतंच वाजतं; गीतकार कोण माहित आहे का?

(pratapsingh bodade got paralysis attack in akola when he performing on stage)

प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल.
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला.
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले.
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा.
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना.
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल.