Well done baby : अखेर प्रतिक्षा संपली, पुष्कर जोग आणि अमृता खानविलकरच्या ‘वेल डन बेबी’चा मुहूर्त ठरला

: वेल डन बेबी हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Pushkar Jog and Amruta Khanvilkar's 'Well Done Baby' will be releasing soon on Amazon Prime)

Well done baby : अखेर प्रतिक्षा संपली, पुष्कर जोग आणि अमृता खानविलकरच्या ‘वेल डन बेबी’चा मुहूर्त ठरला
Follow us
| Updated on: Mar 30, 2021 | 3:53 PM

मुंबई : वेल डन बेबी (Well done baby) हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट आता लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 9 एप्रिलला हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. आज या चित्रपटाचं नवं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सादर होत असणाऱ्या या नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन नवोदित प्रियंका तंवर यांनी केलं आहे. पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट कौटुंबिक आणि विविध भावनांच्या मिश्रणासोबतच या सिनेमाची कथा प्रत्येकाला आपलीशीही वाटेल.

‘वेल डन बेबी’ कौटुंबिक चित्रपट

अॅमेझॉन सादर करत असलेली ‘वेल डन बेबी’ ही एका खऱ्या कुटुंबावरून प्रेरित अशी हृदयस्पर्शी कथा आहे. आधुनिक जगातील एक तरुण जोडपं (अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग) आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न या चित्रपटात करतात. आत्मशोधाच्या मार्गावर घेऊन जाणारी वेल डन बेबीची कथा अत्यंत गुंतवून ठेवणारी आहे आणि ही कथा नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकून घेणार हे नक्की.

निर्माता पुष्कर जोगची प्रतिक्रिया

या कौटुंबिक मनोरंजक सिनेमाबद्दल अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग म्हणाला, ‘वेल डन बेबी हा माझा प्रिय सिनेमा आहे. ही कथा मांडणं आणि व्यक्तिरेखांच्या भावभावनांचे हिंदोळे जिवंत करणे हा एक स्वतंत्र प्रवासच होता आणि मला आनंद आहे की अखेर अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर आमच्या प्रेक्षकांना ही कथा दाखवण्याची संधी मला अखेर मिळाली.”

अमृता खानविलकरची प्रतिक्रिया

या सिनेमाबद्दल बहुआयामी अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणाली, “वेल डन बेबीची सुंदर कथा हृदयाला नक्की हात घालेल. ही मनोरंजक कथा तुम्हाला हसवेलही आणि प्रसंगी भावनिकही करेल. अनेक अर्थांनी आपली वाटावी, अशी ही कथा आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या माध्यमातून देशभरातील आमच्या चाहत्यांना गुढीपाडव्याची भेट म्हणून हा सिनेमा सादर करताना मला फार छान वाटतंय.”

या मनोरंजक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणाबद्दल दिग्दर्शक प्रियंका तंवर म्हणाली, ‘मराठी सिनेसृष्टीतील काही उत्तम कलाकारांसोबत काम करणं आणि एका चाचपडणाऱ्या कुटुंबाची गुंतवून ठेवणारी कथा मांडणं हा फार आनंददायक अनुभव होता. ही एक अपांरपरिक आधुनिक काळातील कथा आहे. कुटुंबातील प्रत्येक जण या सिनेमाचा आनंद घेऊ शकतो. यंदाच्या गुढीपाडव्याला प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल, त्यांचे मनोरंजन होईल याचा मला आनंद आहे.’

संबंधित बातम्या

कोरोनाची लागण तरीही रंगांची उधळण, पीपीई कीट घालून मिलिंद सोमण-अंकिताने साजरी केली होळी!

Video | नारळ वाढवून अभिनेत्याच्या फोटोची पूजा, पवन कल्याणच्या ‘वकील साब’च्या ट्रेलर लाँच दरम्यान थिएटरमध्ये राडा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.