Well Done Baby | आधुनिक काळातल्या जोडप्याची गोष्ट, पुष्कर-अमृताच्या ‘वेल डन बेबी’ चित्रपटातील ‘हलकी हलकी’ गाणे प्रदर्शित!

बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'वेल डन बेबी' (Well done baby) हा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 9 एप्रिलला हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. नुकतच या चित्रपटातील नवं गाणं ‘हलकी हलकी’ रिलीज करण्यात आलंय.

Well Done Baby | आधुनिक काळातल्या जोडप्याची गोष्ट, पुष्कर-अमृताच्या ‘वेल डन बेबी’ चित्रपटातील ‘हलकी हलकी’ गाणे प्रदर्शित!
वेल डन बेबी
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 2:40 PM

मुंबई : बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘वेल डन बेबी’ (Well done baby) हा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 9 एप्रिलला हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. नुकतच या चित्रपटातील नवं गाणं ‘हलकी हलकी’ रिलीज करण्यात आलंय. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सादर होत असणाऱ्या या नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन नवोदित प्रियंका तंवर यांनी केलं आहे. पुष्कर जोग (Pushkar Jog), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट कौटुंबिक आणि विविध भावनांच्या मिश्रणासोबतच या सिनेमाची कथा प्रत्येकाला आपलीशीही वाटेल अशी आहे (Pushkar Jog Upcoming film Well Done Baby new song halki halki release).

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शनासाठी ‘वेल डन बेबी’ला केवळ काही दिवसांचा अवधी उरलेला असतानाच  अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने चित्रपटाच्या आणखी एका नवीन गाण्याचे अनावरण करण्यात आल्याने चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. ‘हलकी हलकी’ असे शीर्षक असलेले हे नवे गाणे आणि याचे सुखद संगीत कौटुंबिक-नाट्य असलेल्या या कथेत अगदी उत्तम प्रकारे बसते. याच्या लक्षवेधक व्हिडीओतील सुंदर सिनेमॅटोग्राफीसह या गाण्याचे बोल श्रोत्यांच्या हृदयाची तार अचूक छेडतात.

रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत रोहन प्रधान यांनी गायले असून, वलय मुळगुंड यांनी हे गाणे लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या चित्रपटाच्या पहिले गाणे ‘आई-बाबा’ला अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे.

पाहा गाणे :

आधुनिक काळातल्या जोडप्याची गोष्ट

अॅमेझॉन सादर करत असलेली ‘वेल डन बेबी’ ही एका खऱ्या कुटुंबावरून प्रेरित अशी हृदयस्पर्शी कथा आहे. आधुनिक जगातील एक तरुण जोडपं (अमृता खानविलकर आणि पुष्कर जोग) आपल्या लग्नाचा उद्देश शोधण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न या चित्रपटात करतात. आत्मशोधाच्या मार्गावर घेऊन जाणारी वेल डन बेबीची कथा अत्यंत गुंतवून ठेवणारी आहे आणि ही कथा नक्कीच प्रेक्षकांची मनं जिंकून घेणार हे नक्की (Pushkar Jog Upcoming film Well Done Baby new song halki halki release).

निर्माता पुष्कर जोगची प्रतिक्रिया

या कौटुंबिक मनोरंजक सिनेमाबद्दल अभिनेता आणि निर्माता पुष्कर जोग म्हणाला, ‘वेल डन बेबी हा माझा प्रिय सिनेमा आहे. ही कथा मांडणं आणि व्यक्तिरेखांच्या भावभावनांचे हिंदोळे जिवंत करणे हा एक स्वतंत्र प्रवासच होता आणि मला आनंद आहे की अखेर अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर आमच्या प्रेक्षकांना ही कथा दाखवण्याची संधी मला अखेर मिळाली.”

अमृता खानविलकरची प्रतिक्रिया

या सिनेमाबद्दल बहुआयामी अभिनेत्री अमृता खानविलकर म्हणाली, “वेल डन बेबीची सुंदर कथा हृदयाला नक्की हात घालेल. ही मनोरंजक कथा तुम्हाला हसवेलही आणि प्रसंगी भावनिकही करेल. अनेक अर्थांनी आपली वाटावी, अशी ही कथा आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या माध्यमातून देशभरातील आमच्या चाहत्यांना गुढीपाडव्याची भेट म्हणून हा सिनेमा सादर करताना मला फार छान वाटतंय.”

(Pushkar Jog Upcoming film Well Done Baby new song halki halki release)

हेही वाचा :

PHOTO | मुंबई विमातळावरही दिसला जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज, स्टायलिश लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा!

‘माथ्यावर हंडा हाय पान्याचा…’ गाणं गाजलं अन् लग्नही जुळलं; वाचा, ‘या’ गीतकाराच्या आयुष्यातील किस्सा!

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.