मुंबई : फँड्री चित्रपटातील सोज्वळ चेह-याची शालू अर्थात राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. ती मोठ्या आवडीनं चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. असाच शालूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडीओमधील शालूच्या अदा पाहून शालूचे चाहते घायाळ होत आहेत. (Rajeshwari Kharat alias Shalu hot dance video goes viral on social media)
शालूने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये शालूचा एकदम हॉट अंदाज दिसत आहे. खरं तर चित्रपटात तिच्या तोंडी एकही डायलॉग नव्हता. मात्र, हि शालू आता सोशल मीडियावर स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.
राजेश्वरी खरातने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एका गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसते आहे. लाल ड्रेस, कातिलाना अदा आणि भन्नाट डान्स या व्हिडीओमध्ये शालू करते आहे. शालूचे लटके झटके पाहून चाहते म्हणत आहेत की, जीव घेणार काय आता…शालूचा हा डान्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.
संबंधित बातम्या :
फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन…
(Rajeshwari Kharat alias Shalu hot dance video goes viral on social media)