AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajeshwari Kharat : काळेभोर केस… निळेशार डोळे… निळा ड्रेस… दिसते जणू परी; राजेश्वरी म्हणते, मी तर परम सुंदरी

शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खराचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (Rajeshwari Kharat : looks like a fairy; Rajeshwari Kharat's amazing dance on Param Sundari song)

Rajeshwari Kharat : काळेभोर केस... निळेशार डोळे... निळा ड्रेस... दिसते जणू परी; राजेश्वरी म्हणते, मी तर परम सुंदरी
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 7:41 AM

मुंबई : मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) यांचा गाजलेल्या ‘फँड्री’ (Fandry) या चित्रपटातील सोज्वळ चेहऱ्याची शालू म्हणजेच राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) नेहमीच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आता तुमच्या लाडक्या शालूनं ‘मिमी’ चित्रपटातील ‘परम सुंदरी’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे.

पाहा शालूचा व्हिडीओ

शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खराचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. राजेश्वरीनं ‘Param Sundari ??’ असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर तिच्या एका चाहत्यानं ‘तुम्ही परफेक्ट आहात तुमच्या सारखं कुणीच नाहीये, तुम्ही खूप सुंदर आहात…’.  शालूचा या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. निळ्या रंगाच्या घरारा ड्रेसमध्ये तिनं काही फोटोसुद्धा शेअर केले आहेत.

राजेश्वरीच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस

राजेश्वरी खरातच्या फोटो आणि व्हिडीओवर कमेंट्सचा महापूर येतो. राजेश्वरीच्या लूक्सचं कौतुक करणाऱ्या चारोळ्याही त्यामध्ये असतात. विशेष म्हणजे त्यापैकी काही कमेंट्सना राजेश्वरी स्वतः उत्तरही देते. त्यामुळे तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये अहमहमिका रंगलेली असते. चाहते आपल्या लाडक्या शालूचे फोटोही मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या वॉलवर शेअर करतात. त्यामुळे तिच्या फोटोवरील कमेंटमधल्या ‘शेरां’सोबत सव्वाशेरांनी केलेल्या शेअर्सची संख्याही सव्वाशेच्या घरात जाते (Shalu Fame Actor Rajeshwari Kharat Share Don’t Rush trend video on social media).

राजेश्वरीवर मीम्स

“सरकारने सर्वात आधी फँड्रीतल्या शालूच्या फोटोवरच्या कमेंट्सवर लॉकडाऊन लावावा, तिथेच सर्वात जास्त गर्दी होते” असे मीम सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. आता शालू उर्फ राजेश्वरी खरात, या मीमवर काही रिअॅक्शन देणार का, याकडेही चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

‘फँड्री’नंतर प्रचंड बदलली शालू!

राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चित्रपटात उत्कृष्ट काम केले. आपल्या अभिनयाने तिने रसिकांच्या मनावर ठसा उमटवला. ‘शालू’चे पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. ‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी आता, मात्र ग्लॅमरस अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे.

चित्रपटात राजेश्वरीच्या वाट्याला जास्त डायलॉग आले नसले तरी, तिने तिच्या नजरेनेच सगळ्यांची मने जिंकली होती. तिच्या चेहऱ्यावरील सहज अभिनय चाहत्यांना भावला होता. चित्रपटात जब्याप्रमाणे शालूच्या भूमिकेला तितकीशी लोकप्रियता मिळाली नाही. ‘फँड्री’ नंतर राजेश्वरीने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले. परंतु, तो चित्रपटही फार कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मात्र इतक्या काळानंतर ती बदलेल्या अवतारात पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसमोर आली आहे.

संबंधित बातम्या

Bigg Boss OTT : दिव्या अग्रवालला अभिनेत्री सनी लिओनीची साथ, पाहा खास फोटो

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा आणि निकचा रोमान्स, रोमांटिक फोटो व्हायरल; सोशल मीडियाचं तापमान वाढलं

Nusrat Bharucha : अभिनेत्री नुसरत भरुचाचा कातिलाना अंदाज, पाहा फोटो

Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय
Boycott Turkey: पाकला दिलेली साथ तुर्कीला भोवणार, भारतातून मोठा निर्णय.
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?
शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?.
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह
त्यांनी धर्म विचारला होता, आम्ही कर्म पाहून मारलं - मंत्री राजनाथ सिंह.
ऑपरेशन सिंदूरआधी मोदींच्या 45 गुप्त बैठका, सौदीत दौऱ्यातच ठरवलं अन्...
ऑपरेशन सिंदूरआधी मोदींच्या 45 गुप्त बैठका, सौदीत दौऱ्यातच ठरवलं अन्....
'गोकुळ'च्या आघाडीत बिघाडी? अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत
'गोकुळ'च्या आघाडीत बिघाडी? अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत.
VIDEO भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकच्या चिंध्या, लॉन्चपॅड बेचिराख अन्..
VIDEO भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकच्या चिंध्या, लॉन्चपॅड बेचिराख अन्...
ऑपरेशन सिंदूरची अमेरिकेत वाह वाह...भारतीय सैन्याचं कौतुक करत म्हटलं...
ऑपरेशन सिंदूरची अमेरिकेत वाह वाह...भारतीय सैन्याचं कौतुक करत म्हटलं....
पाणी बंद करण्याचा विचार जरी.., शाहबाज शरीफ यांची फुसकी धमकी
पाणी बंद करण्याचा विचार जरी.., शाहबाज शरीफ यांची फुसकी धमकी.
पाकची अवस्था भेदरलेल्या कुत्र्यासारखी, शेपूट घालून पळापळ अन् याचना...
पाकची अवस्था भेदरलेल्या कुत्र्यासारखी, शेपूट घालून पळापळ अन् याचना....
पाकिस्तानने पत्र पाठवल्यानंतरही पाकची 'ती' विनंती भारतानं धुडकवली
पाकिस्तानने पत्र पाठवल्यानंतरही पाकची 'ती' विनंती भारतानं धुडकवली.