AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋतुजा बागवे-विशाल फाले म्हणतायत ‘जीव रंगलया’, नव्या गाण्यात झळकणार नवी जोडी!

लग्नाआधीच्या बऱ्याच लव्हस्टोऱ्या आपण प्रत्यक्षात पहिल्या आहेत, काहींनी तर अनुभवल्या देखील आहेत. मात्र, लग्नानंतरची पती पत्नी यांच्यातील लव्हस्टोरी नेमकी कशी असेल बरं? याचं साजेसं उत्तर घेऊन 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट' प्रस्तुत 'सेवन सिझ मोशन पिक्चर' निर्मित 'जीव रंगलया' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

ऋतुजा बागवे-विशाल फाले म्हणतायत 'जीव रंगलया', नव्या गाण्यात झळकणार नवी जोडी!
Jeev Rangalaya
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 11:31 AM

मुंबई : लग्नाआधीच्या बऱ्याच लव्हस्टोऱ्या आपण प्रत्यक्षात पहिल्या आहेत, काहींनी तर अनुभवल्या देखील आहेत. मात्र, लग्नानंतरची पती पत्नी यांच्यातील लव्हस्टोरी नेमकी कशी असेल बरं? याचं साजेसं उत्तर घेऊन ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘सेवन सिझ मोशन पिक्चर’ निर्मित ‘जीव रंगलया’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट नेहमीच वेगवेगळे चित्रपट आणि गाणी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात, यातच भर घालत ते लग्नानंतरची लव्हस्टोरी म्हणजे ‘जीव रंगलया’ हे गाणे घेऊन येत आहेत.

या गाण्यात अभिनेत्री ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) आणि विशाल फाले (Vishal Phale) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर विशाल फाले ‘प्रिन्स ऑफ मुळशी’ या नावाने खूपच प्रसिद्ध आहे. 1 मिलियनहून अधिक फॉलोअर्स असलेला विशाल नावाप्रमाणेच सोशल मीडियावर विशाल आहे. त्यांच्या या गाण्याचे पोस्टर रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले असून यांत ऋतुजा आणि विशाल रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत. या गाण्याच्या टिझरला ही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून, या टिझरने सोशल मीडियावर चर्चा रंगवली आहे.

पाहा गाण्याची झलक

बहरत जाणाऱ्या प्रेमाची गोडी!

‘जीव रंगलया’ गाण्याच्या पोस्टरमध्ये या दोघांची जोडी अगदी खुलून दिसत असून, बहरत जाणाऱ्या प्रेमाची गोडी त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत आहे. या गाण्यात पती पत्नीच्या लग्नानंतरचा रोमान्स, त्यांची जवळीक यांचे खूप सुंदर वर्णन पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक ओंकार माने दिग्दर्शित हे गाणे असून, गाण्याचे बोल आणि गाण्याच्या निर्मितीत समीर परब यांचा खारीचा वाटा आहे. ओंकारने आजपर्यंत 20 दिग्दर्शित केलेल्या गाण्यांचा पल्ला गाठला आहे. या रोमँटिक गाण्याला संगीत प्रितेश कामत यांनी दिले असून, गायक भूषण गोसावी यांनी हे गाणं आपल्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केले आहे. या गाण्याच्या छायाचित्रणाची जबाबदारी शशिकांत सिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली.

प्रेमाची लव्हेबल केमिस्ट्री घेऊन ‘जीव रंगलया’ हे रोमँटिक गाणे रसिक प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करण्यास तयार झाले. गाण्याच्या पोस्टरने गाण्याची उत्सुकता आणखीनच वाढवून ठेवली आहे. शिवाय या गाण्यात एका नव्या अंदाजात ऋतुजा आणि विशालला पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा :

This week release | सुष्मिता सेनची ‘आर्या’ ते आयुष्मान खुरानाचा ‘चंडीगड करे आशिकी’, आठवडाभर मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

Happy Birthday Dharmendra | मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे रेल्वेत नोकरी, दुसऱ्या लग्नासाठी बदलले नाव!

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी-कतरीनाच्या लग्नात पाहुण्यांना पाळावे लागणार हे नियम

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.