Samrenu Movie : पंकजा मुंडेंच्या हस्ते ‘समरेणू’चं पोस्टर प्रदर्शित, 13 मेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार

महेश डोंगरे दिग्दर्शित ‘समरेणू’ चित्रपटाचे पोस्टर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले असून या चित्रपटात महेश डोंगरे, रूचिता मांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सम्या आणि रेणूची ही प्रेमकहाणी आहे.

Samrenu Movie :  पंकजा मुंडेंच्या हस्ते ‘समरेणू’चं पोस्टर प्रदर्शित, 13 मेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार
पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘समरेणू’चे पोस्टर प्रदर्शितImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 3:51 PM

मुंबई : महेश डोंगरे (Mahesh Dongre) दिग्दर्शित ‘समरेणू’ (Samrenu) चित्रपटाचे पोस्टर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले असून या चित्रपटात महेश डोंगरे, रूचिता मांगडे (Ruchita Mangade) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सम्या आणि रेणूची ही प्रेमकहाणी आहे. येत्या 13 मे रोजी चित्रपटगृहात ‘समरेणू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.‘सुरवात महत्वाची नाय, शेवट महत्वाचाय…’ अशी टॅगलाईन असल्येला या पोस्टरमध्ये सम्या आणि रेणू दिसत असून त्यांचा नात्याचा शेवट कसा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एमआर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखनही महेश डोंगरे यांनी केले आहे. सूरज- धीरज यांचे संगीत असलेल्या या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ruchita Mangade (@mruchitaa)

पोस्टर प्रदर्शनाबाबत पंकजा मुंडे म्हणतात, “या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मी उत्सुक आहे. याचे कारण हे निर्माते माझ्या जिल्ह्यातील आहेत आणि या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण बीड जिल्ह्यात झाले आहे. बीड जिल्ह्यात खूप कष्टकरी लोक आहेत, जे विविध राज्यात कामानिमित्ताने जातात. त्यांच्यात हुशारी असल्याने त्यांनी आपला ठसा विविध ठिकाणी उमटवला आहे. हा चित्रपट सफल व्हावा, याकरता मी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देते.”

चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता महेश डोंगरे म्हणतात, “हा माझा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून पहिला चित्रपट आहे. त्यामुळे मला या चित्रपटाच्या प्रदर्शनाची खूपच उत्सुकता आहे. ही एक प्रेमकहाणी आहे. जास्त काही सांगणार नाही परंतु सम्या आणि रेणूच्या प्रेमाचा प्रवास एका रंजक वळणावर जाणार आहे. या चित्रपटाची संगीत टीम अतिशय जबरदस्त आहे. त्यामुळे चित्रपटाची गाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडतील..”

एमआर फिल्म्स वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखनही महेश डोंगरे यांनी केले आहे. सूरज- धीरज यांचे संगीत असलेल्या या गाण्यांना गुरू ठाकूर आणि क्षितीज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. तर या गाण्यांना कुणाल गांजावाला, निती मोहन, आदर्श शिंदे आणि अजय गोगावले अशा दमदार गायकांचा आवाज लाभला आहे. धमाकेदार संगीत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत.

View this post on Instagram

A post shared by MarathiStars (@marathistar)

संबंधित बातम्या

‘किचन कल्लाकार’च्या मंचावर राजकीय धुरळा; किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ, रुपाली ठोंबरे बनवणार पदार्थ

Viral Video : जेव्हा आलिया भट रणबीरसाठी पिझ्झा ऑर्डर करते… व्हीडिओ पाहुन तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल…

सलमान खानला दिलासा; पत्रकाराला धमकी प्रकरणी कोर्टात हजर राहण्यापासून सूट

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.