AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sher Shivraj: ‘शेर शिवराज’ पाहणाऱ्यांसाठी चिन्मय मांडलेकरची कळकळीची विनंती; ‘ती’ चूक करण्याआधी हा Video पहा!

हा चित्रपट थिएटरमध्ये पाहणाऱ्यांसाठी चिन्मयने कळकळीची विनंती केली आहे. चिन्मयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना विनंती केली आहे. (Sher Shivraj)

Sher Shivraj: 'शेर शिवराज' पाहणाऱ्यांसाठी चिन्मय मांडलेकरची कळकळीची विनंती; 'ती' चूक करण्याआधी हा Video पहा!
Chinmay MandlekarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 5:00 PM

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या शिवराज अष्टकातील चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा 22 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून आता त्याचे शोज वाढवण्यात येत आहेत. अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. शिवचरित्रातील ‘अफझलखान वध’ हा शिवकालीन इतिहासाचा महत्त्वाचा अध्याय आहे. ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो. आता हाच ऐतिहासिक सुवर्णअध्याय या चित्रपटातून दाखवण्यात आला आहे. मात्र हा चित्रपट थिएटरमध्ये पाहणाऱ्यांसाठी चिन्मयने कळकळीची विनंती केली आहे. चिन्मयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना विनंती केली आहे.

काय म्हणाला चिन्मय मांडलेकर?

“तुम्ही या चित्रपटावर पहिल्या दिवसापासून, पहिल्या शोपासून जे भरभरून आणि तुडुंब प्रेम करताय ते आमच्यापर्यंत पोहोचतंच आहे. फक्त तुम्हा सर्वांना एक अत्यंत नम्र आणि कळकळीची विनंती करतो की चित्रपट पाहत असताना चित्रपटाचा शेवट मोबाईलवर शूट करून तो सोशल मीडियावर शेअर करू नका. आपले इतर मित्र जे हा चित्रपट नंतर बघणार आहेत, त्यांना तो थरार चित्रपटगृहात तसाच अनुभवू द्या, जसा तुम्ही अनुभवलात. माझी खात्री आहे की माझ्या या विनंतीला तुम्ही नक्की मान द्याल,” असं तो या व्हिडीओत म्हणाला.

पहा व्हिडीओ

अनेकांनी शेर शिवराजच्या क्लायमॅक्सचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र क्लायमॅक्सचा सीन अशा पद्धतीने लीक होऊ नये म्हणून चिन्मयने ही विनंती केली आहे. चिन्मयच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘सॉरी सर मी स्टोरीमध्ये शेवटचा सीन अपलोड केला होता. मला माझी चूक लक्षात आली आता स्टोरी डिलिट करतो,’ असं एकाने म्हटलं. तर अनेकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहणार असल्याचं सांगितलंय. ज्यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांनी चिन्मयच्या अभिनयाचं आणि चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

हेही वाचा:

Sher Shivraj Collection: ‘शेर शिवराज’चे शोज हाऊसफुल! पहिल्या दिवशी दणक्यात कमाई

KGF 2: ‘रॉकीभाई’ची रॉकिंग कमाई; ‘केजीएफ 2’ने पार केला 300 कोटींचा टप्पा

नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.