Sher Shivraj: “कलियुगातल्या हिरण्यकश्यपुला महाराष्ट्राच्या दगडादगडातल्या नरसिंहांचं दर्शन घडवुया”; पहा ‘शेर शिवराज’चा दमदार ट्रेलर

'शेर शिवराज' (Sher Shivraj) चित्रपटात अफजलखानाची भूमिका कोण साकारणार, याची उत्सुकता गेले अनेक दिवस साऱ्यांनाच लागली होती. त्या रहस्याभोवतीचा पडदा या ट्रेलर अनावरण सोहळयाच्या निमित्ताने उघडला. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी (Mukesh Rishi) अफजलखानाची भूमिका साकारणार आहेत.

Sher Shivraj: कलियुगातल्या हिरण्यकश्यपुला महाराष्ट्राच्या दगडादगडातल्या नरसिंहांचं दर्शन घडवुया; पहा 'शेर शिवराज'चा दमदार ट्रेलर
Sher ShivrajImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 8:56 AM

महाराजांची गळाभेट, अफजलखानाचा फसलेला कपटी डाव आणि त्यानंतर महाराजांनी खानाचा बाहेर काढलेला कोथळा हे सर्व पाहून इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचा भास उपस्थितांना झाला. निमित्त होते ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj Trailer) चित्रपटाच्या ट्रेलर अनावरण सोहळयाचे. अफजलखानाचा कपटी डाव महाराजांनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने त्याच्यावरच कसा उलटवला याची छोटीशी झलक उपस्थितांना रंगमंचावर प्रत्यक्ष पहायला मिळाली. ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) चित्रपटात अफजलखानाची भूमिका कोण साकारणार, याची उत्सुकता गेले अनेक दिवस साऱ्यांनाच लागली होती. त्या रहस्याभोवतीचा पडदा या ट्रेलर अनावरण सोहळयाच्या निमित्ताने उघडला. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी (Mukesh Rishi) अफजलखानाची भूमिका साकारणार आहेत.

या ट्रेलर अनावरणप्रसंगी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील ‘शेर शिवराज’ हे चौथे पुष्प छत्रपतींच्या चरणी अर्पण करताना आनंद होत असल्याचे सांगितले. तसेच चित्रपटाचे निर्माते नितीन केणी, प्रद्योत पेंढरकर, अनिल नारायणराव वरखडे यांचे आभार व्यक्त केले. चित्रपटाच्या संगीताविषयी संगीतकार देवदत्त बाजी, गायक अवधूत गांधी, जुईली जोगळेकर यांनी गीतरचनेच्या आठवणी सांगतानाच त्याची सुरेल झलक यावेळी सादर केली. चित्रपटाविषयीचे अनुभव आणि आपल्या भूमिकेचे नानाविध पैलू मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, विक्रम गायकवाड या कलाकारांनी याप्रसंगी उलगडले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर उभी राहणारी ही व्यक्तिरेखा साकारण्याचं भाग्य मिळाल्याचा आनंद व्यक्त करतानाच ज्याच्या ध्यासात छत्रपती शिवाजी महाराज आहेत अशा कल्पक आणि अभ्यासू दिग्दर्शकासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाल्याचं, अभिनेते मुकेश ऋषी यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दराऱ्यामुळेच भारताकडे वाकडया नजरेने बघण्याची कोणाचीही हिंमत झाली नसल्याचे परखड विधान त्यांनी यावेळी केले.

पहा ट्रेलर-

किल्ले प्रतापगडावर महाराजांनी अफजलखानासारख्या बलाढ्य शत्रूला पराजित करत यमसदनास धाडले होते. गनिमीकाव्याने खेळले गेलेले हे युध्द आणि मिळवलेला प्रचंड विजय महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच विसरला जाऊ शकत नाही. शिवचरित्रातील ही यशस्वी गाथा ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या रुपाने 22 एप्रिलला मोठया पडदयावर येणार आहे.

‘शेर शिवराज’ चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज तर बलाढ्य अफजलखानाच्या रुपात मुकेश ऋषी त्यांच्यासोबत मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, वैभव मांगले, सुश्रुत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर,ईशा केसकर, रिशी सक्सेना, अशी कलाकारांची तगडी फौज पहायला मिळणार आहे.

हेही वाचा:

KGF Chapter 2: प्रदर्शनाआधीच ‘केजीएफ 2’चा धमाका; मोडला RRRचा विक्रम

रुपाली चाकणकर यांच्या मुलाचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.