Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’, तरुणाईचं भावविश्व स्टोरीटेलच्या ऑडिओबुकमध्ये!

गावाच्या पारापासून ते मेट्रो सिटीच्या कॅफेपर्यंत कुठेही कट्टा टाकणाऱ्या कोणत्याही तरुण तरुणींच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्या सारख्याच आणखी तीन मुलभूत गरजा म्हणजे, रिलेशनशिप स्टेट्स, करिअरचा सक्सेस आणि वाय फायचा स्पीड.

'सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड', तरुणाईचं भावविश्व स्टोरीटेलच्या ऑडिओबुकमध्ये!
Audiobook
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 7:50 AM

मुंबई : गावाच्या पारापासून ते मेट्रो सिटीच्या कॅफेपर्यंत कुठेही कट्टा टाकणाऱ्या कोणत्याही तरुण तरुणींच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्या सारख्याच आणखी तीन मुलभूत गरजा म्हणजे, रिलेशनशिप स्टेट्स, करिअरचा सक्सेस आणि वाय फायचा स्पीड. यात रिलेशनशिप स्टेट्स सिंगल आहे की, कमिटेड याचा परिणाम करियरवर व्हायला वेळ लागत नाही आणि वाय फाय स्पीडवरच तर तुम्ही सिंगलचे कमिटेड होणार की नाही, हे ठरत असतं. आजच्या तरुणाईला आपलेच वाटतील असे सचिन, सायली आणि सुरेखा या एकमेकांचे घट्ट दोस्त असणारे आणि त्याच बरोबर एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे तिघेजण तुम्हाला भेटतील ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ या स्टोरीटेल मराठीच्या नव्या कोऱ्या करकरीत ऑडीओ सीरीजमध्ये.

गुणी अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि उत्तम लेखक आणि अभिनेता असणाऱ्या साईनाथ गणूवाड यांनी या ऑडीओ सीरीजला आवाज दिला आहे. माधवी वागेश्वरीने ही ऑडीओ सीरीज खास स्टोरीटेल मराठीसाठी लिहिली आहे. या आधी देखील ‘करसाळ’ ही स्टोरीटेल मराठीसाठी पहिली मल्टी व्होईस सीरीज तिने लिहिली होती, ज्याकडे वेगळा प्रयोग म्हणून पाहिलं गेलेलं आहे.

‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ या सीरीजसाठी पूजा आणि साईनाथ यांनी विशेष मेहनत घेतली आहे. ही गोष्ट मराठवाडा आणि पुणे अशा दोन ठिकाणी घडते, त्यामुळे त्या त्या व्यक्तिरेखांचे आवाज, भाषेचे बारकावे समजून उमजून घेऊन त्याच बरोबर गोष्ट वाचनातून वेगवान ठेवण्याचे काम त्यांनी एकमेकांच्या मदतीनं पेलेलं आहे.

व्यक्तिरेखा फुलवण्याचा प्रयत्न

प्रसिद्ध अभिनेत्री पूजा ठोंबरे म्हणाली, “जेव्हा मी ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ची संहिता ऐकली तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडले. एकाच सीरीजमधल्या खूप साऱ्या पात्रांना मला आवाज द्यायचा हे समजल्यावर मी अधिकच उत्साही होते. त्या पात्रांचे व्हेरिएशन्स, त्यांच्यातील डिटेलिंग, बारीक बारीक बारकाव्यांचे निरीक्षण नोंदवून त्या व्यक्तिरेखा फुलवण्याचा मी प्रयत्न केलाय. या मालिकेत एकाचवेळी माझ्यापेक्षा कमी वयाची मुलगी’ सुरेखा’चं पात्र वाचलंय आणि त्याचवेळी मी तिच्या आईचंही पात्र वाचलंय. त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी अद्भुत होत, हा अनुभव मी पहिल्यांदाच घेतलाय. माधवी वागेश्वरीने ही मालिका फारच अप्रतिम लिहिली आहे.”

मी ही यातलाच एक!

अभिनेता साईनाथ गणूवाड सचिन या मध्यवर्ती व्यक्तिरेखेविषयी तो सांगतो की, ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ ही गोष्ट ऐकूनच वाटलं की ही आजची गोष्ट आहे., गोष्टीत असणारे सुरेखा, सचिन, सायली हे आजूबाजूला बघितलेलेच वाटतात. त्यात सचिन गावाकडून पुण्यात, mpsc साठी आलेला मुलगा आहे, असे कित्येक सचिन मी जवळून पहिले आहेत, मीही त्यातलाच एक आहे. त्यामुळे त्या पात्राला जे वाटतंय, ते समजून घ्यायला मदत झाली. पूजा सोबत या आधी नाटक केलं होतं, आम्ही नाटकासारखीच पूर्ण गोष्ट वाचून तालीम केली. तालमीतच आम्हाला या व्यक्तिरेखांचे आवाज आणि लकबी सापडत गेल्या.

काय आहे ही कथा?

तरुण वयात आपल्यावर जिवापाड प्रेम करणारं, आपली वाट पाहणारं कोणीतरी असावं असं प्रत्येक मुलाला आणि मुलीला वाटत असतंच परंतु प्रेमाचं नातं म्हणलं की, ते निभावण्याच्या जबाबदारीपासून मुलं पळू काढू लागतात, नात्याची जबाबदारी निभवण्याच्या थकव्यापेक्षा नात्यापासून, प्रेमापासून पळण्याचा थकवा जास्त असतो का? काय करायचं नेमकं ? असा कॉम्प्लिकेटेड प्रश्न मुलांना पडतो आणि नातं तर हवच, प्रेमही हवं….त्यासाठी तयारी हवी….पण नाही जमलं तर?….मध्येच डाव मोडावा वाटला तर? ..नात्यासाठी समर्पण महत्वाचं की स्वत:साठीचं उत्तरदायित्व?….काय करायचं नेमकं? ….असा  कॉम्प्लिकेटेड प्रश्न मुलींना पडतो.

तुम्हालाही असेच प्रश्न पडत असतील आणि तुम्ही सिंगल असाल किंवा नसाल, तरीही आवर्जून ऐका, ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ फक्त स्टोरीटेलवर. स्टोरीटेल इंग्रजी, हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलगू, आसामी, गुजराती आणि कन्नड या 11 भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक आणि ईबुक्स प्रकाशित करते.

हेही वाचा :

रितिका श्रोत्री आणि विनायक माळीचा मॅडनेस, बघायला मिळणार धमाल मनोरंजनाचा ‘मॅड’ तडका

Ganesh Chaturthi 2021 : तैमूर अली खान ते अनन्या पांडेपर्यंत सेलेब्सनं जल्लोषात केलं बाप्पाचं स्वागत, पाहा खास फोटो

मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....