Sonalee Kulkarni: सोनाली- कुणालच्या लग्नाचं स्पेशल गाणं ‘तुला मी, मला तू…’ प्रेक्षकांच्या भेटीला

गाण्यामध्ये दोघांनीही एकमेकांना दिलेले सात जन्माचे वचन, प्री-वेडिंगचा अप्रतिम डान्स, पाहुण्यांची रेलचेल, दागिन्यांमध्ये सजलेले वर- वधू आणि वेगवेगळ्या फुलांच्या माळांनी सजवलेले मंडप असे अनेक क्षणचित्रे यात टिपले आहेत.

Sonalee Kulkarni: सोनाली- कुणालच्या  लग्नाचं स्पेशल गाणं ‘तुला मी, मला तू...’ प्रेक्षकांच्या भेटीला
सोनाली आणि कुणाल यांच्या लग्नातील काही खास क्षणांवर असलेलं ‘तुला मी मला तू…’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 9:21 AM

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) यांच्या लग्नाची (Wedding) चर्चा सोशल मिडीयापासून तिच्या चाहत्यांपर्यंत चांगलीच रंगली आहे. सोनाली आणि कुणाल यांच्या लग्नातील काही खास क्षणांवर असलेलं ‘तुला मी मला तू…’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं अमेय जोग आणि प्रियांका बर्वे यांच्या सुमधुर आवाजात गायलं आहे. तर या गाण्याचे संगीतकार अमेय आणि दर्शना असून गीतकार प्रशांत मडपुवार आहेत. गाण्यामध्ये दोघांनीही एकमेकांना दिलेले सात जन्माचे वचन, प्री-वेडिंगचा अप्रतिम डान्स, पाहुण्यांची रेलचेल, दागिन्यांमध्ये सजलेले वर- वधू आणि वेगवेगळ्या फुलांच्या माळांनी सजवलेले मंडप असे अनेक क्षणचित्रे यात टिपले आहेत.

गाण्याबद्दल संगीतकार अमेय व दर्शना म्हणतात, “ सातासमुद्रापलीकडे पार पडलेलं सोनाली आणि कुणाल यांच्या लग्नावर गाणं करायचं जेव्हा आम्ही ठरवलं, तेव्हा कोणताही वेळ न दवडता आम्ही होकार दिला. हे प्रेमगीत प्रत्येकाच्या ओठांवर रूळणारं आहे. लग्नातील क्षणचित्रे गाण्यांमध्ये दाखवणं आमच्यासाठी आव्हनात्मक होतं. सोनालीचं हे गाणं तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल.”

हे सुद्धा वाचा

गाण्याबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणते, “लग्न म्हटलं तर प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खास क्षण असतो. माझ्या लग्नातील खास क्षण मी गाण्याच्या स्वरूपात टिपून ठेवला आहे आणि तेच खास क्षण मी माझ्या चाहत्यांसोबत शेअर करतेय.”

सनई चौघडे… फुलांच्या रंगीबेरंगी माळा… लग्नमंडप… जरतारीच्या पैठणीमध्ये, दागिन्यांमध्ये सजलेली नवरी, तर शेरवानीमध्ये राजबिंडा दिसणारा नवरा… पाहुण्यांची लगबग… जेवणात मराठमोळा बेत… असा हा सोनाली-कुणालचा भव्य, पारंपरिक लग्नसोहळा लंडनमध्ये पार पडला. अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली-कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनालीचं लग्न कसं झालं, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. 11 ऑगस्ट पासून प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सोनालीचं लग्न तीन भागांत प्रसारित करण्यात आलं. एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.