Video: आषाढी एकादशीनिमित्त ‘विठ्ठला तूच तूच तू’ गाणं विठ्ठलभक्तांच्या मनावर करणार राज्य

वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आषाढी एकदशीचं मोठं महत्त्व आहे. विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेल्या भक्ताला विठ्ठलाच्या तालावर नाचवण्यास 'विठ्ठला तूच तूच तू' हे भक्तिमय सज्ज झालं आहे.

Video: आषाढी एकादशीनिमित्त 'विठ्ठला तूच तूच तू' गाणं विठ्ठलभक्तांच्या मनावर करणार राज्य
'विठ्ठला तूच तूच तू' गाणं विठ्ठलभक्तांच्या मनावर करणार राज्यImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 8:22 AM

पांडुरंग आणि त्याची पंढरी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी हक्काचे माहेरघर आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठुरायाचं आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) दिवशी विशेष महत्व आहे. आषाढी एकादशी म्हटली की प्रथम डोळ्यासमोर येते ती विठू माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन होणारी पंढरपूरची वारी. विठू माऊलीच्या नामाने आणि आषाढी एकादशीचे औचित्य साधत ‘विठ्ठला तूच’ (Vitthala Tuch) या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या चित्रपटातील पहिलं वहिलं ‘विठ्ठला तूच तूच तू’ हे गाणं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला समोर आलं आहे. ‘वाय.जे. प्रॉडक्शन’ निर्मित आणि दिग्दर्शक प्रफुल्ल म्हस्के दिग्दर्शित ‘विठ्ठला तूच’ या चित्रपटातील हे गाणं असून आषाढी एकादशीचं निमित्त साधून हे गाणं विठुरायाच्या भक्तांसाठी समोर आलं आहे.

वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रात आषाढी एकदशीचं मोठं महत्त्व आहे. विठ्ठलाच्या भक्तीत दंग झालेल्या भक्ताला विठ्ठलाच्या तालावर नाचवण्यास ‘विठ्ठला तूच तूच तू’ हे भक्तिमय सज्ज झालं आहे. ‘विठ्ठला तूच तूच तू’ या गाण्याला संगीत संगीतकार हर्षित अभिराज यांनी दिलं असून या गाण्याच्या गायनाची धुराही हर्षितने उत्तमरीत्या पेलवली आहे. तर या गाण्याच्या कोरियोग्राफीची जबाबदारी योगेश जम्मा यांनी सांभाळली आहे. या गाण्यात नवोदित अभिनेता योगेश जम्मा, अभिनेत्री उषा बिबे, सुशील पवार, हर्षित अभिराज झळकले आहेत. चित्रपटातील गाण्यात विठूरायाला एका विठ्ठलभक्ताने घातलेली आर्त साद पाहणं रंजक ठरणार आहे.

प्रत्येकाला आपण विठुरायाला कधी भेटतो याची आतुरता लागलेली असते. मात्र काही कारणास्तव या वारी पर्यंत कित्येकदा आपल्याला जाता येत नाही. त्यामुळे यंदाच्या आढाषी एकादशी निमित्त विठुरायाचे हे ‘विठ्ठला तूच’ चित्रपटातील ‘विठ्ठला तूच तूच तू’ हे गाणं या सुंदर क्षणाची उणीव भरून काढेल यात शंका नाही.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.