‘शिरच्छेद प्रेमाचा’ चित्रपट जून महिन्याच्या अखेर प्रदर्शित होणार, ग्रामीण भागातील कलाकारांना मिळणार मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी
प्रेमाचा शिरच्छेद या चित्रपटात भंडारा जिल्ह्यातील 150 ग्रामीण कलाकारांनी पहिल्यांदाच काम केले आहे. झाडी बोली भाषा त्यांची वागणूक ,बोलण्याची लय यात ग्रामीण तडका मारलेला आहे.
भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील ग्रामीण कलाकारांना घेवून बनवलेला शिरच्छेद प्रेमाचा (Shrcched premacha) या चित्रपटाच्या 50 मिनिटांच्या प्रीमियर शोचे आयोजन भंडारा येथील सार्वजनिक वाचनालयात करण्यात आले होते.शिरच्छेद प्रेमाचा दिग्दर्शक प्रवीण मोहारे यांनी चित्रपटात , कोरोना काळात हरपले माणुसकी ,मजुरांची झालेली वनवन ,पायपीट व हालअपेष्टा , या काळात युवकांची वाढलेली फरफट हाताला नसलेलं काम त्यामुळे वाढलेल्या बेरोजगारी दारुण चित्रण केल्याचे सांगितले. परिस्थितीसमोर हतबल झालेला तरुणांची वाट कशी चुकते ती मांडणी केली.
चित्रपटातील हिरो भिम्याचे प्रेम बहरन्यापूर्वीच एक प्रेमिका स्वःताला कशी संपवते तर दुसरी प्रेमीका आयपीएस अधिकारी हिची गोळ्या झाडून तिला मारले जाते याचे छान चित्रण केले गेले आहे.हा चित्रपट भंडारा जिल्ह्यात सूट केला गेला असून जिल्ह्यात अनेक स्पॉट असे आहेत की जे चित्रपट चित्रीकरण करून शकतो तसेच लाईट, कॅमेरा, अँक्शन म्हटल तर मुंबई असा उल्लेख येतो मात्र आता भंडारा जिल्ह्यात सुद्धा चित्रपट चित्रीकरण करून जिल्ह्यात कलाकारांना वाव मिळालं आहे.
चित्रपटाला ग्रामीण तडका
प्रेमाचा शिरच्छेद या चित्रपटात भंडारा जिल्ह्यातील 150 ग्रामीण कलाकारांनी पहिल्यांदाच काम केले आहे. झाडी बोली भाषा त्यांची वागणूक, बोलण्याची लय यात ग्रामीण तडका मारलेला आहे.
गुरूंचा सन्मान अन् भेट
गुरू शिष्याला योग्य मार्गही दाखवतात. चांगले आचरण बिंबवतात .यामुळे त्यांचा दर्जा मोठा आहे. त्यामुळेच प्राथमिक शाळेत शिक्षण देणारे गुरुवर्य देवराव कुलरकर व सरला पशिने यांना खास करून प्रीमियर शो ला बोलावले गेले होते. यावेळी त्यांचा शाल श्रीफळ देवून प्रवीण मोहारे यांनी सन्मान केला. त्यांचे आशीर्वाद घेवून प्रेमाचा शिरच्छेद या चित्रपटाची भेट समर्पित केली.
संबंधित बातम्या