‘शेजारीण बाई, तुमचा टीव्ही…’ हे गाणं तीन गीतकारांनी लिहिलंय हे माहीत आहे का?

आनंद शिंदे यांचं 'शेजारीण बाई, तुमचा टीव्ही...' हे गाणं एकेकाळी खूप गाजलं होतं. (three lyricist complete one song for anand shinde, know story)

'शेजारीण बाई, तुमचा टीव्ही...' हे गाणं तीन गीतकारांनी लिहिलंय हे माहीत आहे का?
damodar shirwale
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 5:15 PM

मुंबई: आनंद शिंदे यांचं ‘शेजारीण बाई, तुमचा टीव्ही…’ हे गाणं एकेकाळी खूप गाजलं होतं. विशेष म्हणजे हे गाणं एक नव्हे दोन नव्हे, तीन गीतकारांनी लिहिलं होतं. आनंद शिंदे यांनीच हे गाणं दोन गायकांना लिहायला सांगितलं होतं. एकेकाळी प्रचंड लोकप्रिय झालेल्या या गाण्याचा किस्सा वाचाच. (three lyricist complete one song for anand shinde, know story)

अंतरे आवडले नाही…

शेजारीण बाई, तुमचा टीव्ही, माझ्या पोरांना पाहू द्या, बाबूला आतमधी घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या…

मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणारे कवी गौतम धुमाळ यांना हे गाणं सूचलं होतं. त्यांनी या गाण्याचा मुखडाच लिहिला. त्यांचं हे गाणं गीतकार चंद्रकांत निरभवणे यांनी पूर्ण केलं. पण आनंद शिंदेंना निरभवणे यांनी लिहिलेले अंतरे आवडले नाहीत. त्यामुळे आनंद शिंदे यांनी गीतकार दामोदर शिरवाळे यांना पुढचे अंतरे लिहिण्यास सांगितले. शिरवाळे यांनी लिहिलेले हे अंतरे आनंद यांना आवडले आणि गाणं रेकॉर्ड झालं. पुढे हे गाणं हिटही झालं.

कोण आहेत दामोदर शिरवाळे

दामोदर शिरवाळे यांचा जन्म 1947 मध्ये झाला. ते मूळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिखली गावचे. त्यांचे वडील हरी शिरवाळे हे भारूड गायचे. त्यांचे वडील निरक्षर होते, पण त्यांना दीडशे भारूड मुखोद्गत होते. गरीबीमुळे शिरवाळे कुटुंबीय चिखलीवरून मुंबईत आले. घरच्या परिस्थितीमुळे दामोदर शिरवाळे यांचं शिक्षण खूप उशिरा सुरू झालं. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांना पहिल्या इयत्तेत टाकण्यात आलं होतं. वर्गात ते सर्व मुलांमध्ये थोराड दिसायचे. वाढते वय आणि गरीबी यामुळे त्यांचं शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच झालं. 1966 मध्ये ते राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्समध्ये कामाला लागले. 1970मध्ये ते परमनंटही झाले. 2005मध्ये ते नोकरीतून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर पूर्ण वेळ वाचन, लिखाण आणि गायन याला त्यांनी दिला होता. मात्र, नुकतंच त्यांचं निधन झालं आहे.

इयत्ता दुसरीत असताना गाणं लिहिलं

शिरवाळे यांच्या घरातच गाणं होतं. त्यांचे वडील भारूड गायचे तर त्यांचे थोरले बंधू वामन शिरवाळेही चांगले गायक होते. ते आंबेडकरी गीते गायचे. वडील आणि भावाच्या गाण्यामुळे शिरवाळे यांचे कान तयार झाले होते. त्यामुळे त्यांना गाण्याची गोडीही लागली. इयत्ता दुसरीला असतानाच त्यांनी एक गाणं लिहिलं होतं. ते गाणं असं होतं….

बायको मिळाली फॅशनवाली, रोज लाविते पावडर लाली, हिच्यापाई सारी कमाई गेली, शेजारणी, शेजारणी, शेजारणी…

12 राग शिकले अन्…

शिरवाळे यांनी 1964 पासून गायनास सुरुवात केली. त्यांनी दामोदर शिरवाळे आणि पार्टीची स्थापना केली होती. सुरुवातीला ते दुसऱ्या गायकांची गाणी गायचे. शिरवाळे यांना उत्तम गायक व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी चेंबूरमधील पंडित नारायणगावकर यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. सात महिने त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. संगीताचे धडे घेत असतानाचा एक किस्सा आहे. नाराणगावकर यांनी त्यांना प्रथम यमन राग दिला. त्यानंतर भोग, काफी आणि केदार राग दिला. पण शिरवाळे यांचं पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं व्हायचं. तब्बल सात महिने हे असंच सुरू होतं. ते सर्व राग विसरायचे. या सात महिन्यात जेमतेम 12 राग शिकल्यानंतर त्यांनी गाणं शिकणंच बंद केलं. मात्र, या अर्धवट ज्ञानाचाही त्यांना फायदा झाला. त्यांना गाण्याच्या चाली बांधण्यासाठी त्याचा उपयोग झाला. मीटरचं इंगित त्यांना समजलं.

अडीच ते तीन हजार गीते

शिरवाळे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सुमारे अडीच ते तीन हजार गीते लिहिली आहेत. त्यातील त्यांची असंख्य गीते गाजली. आंबेडकरी गीते, लोकगीते आणि लावण्यांचा त्यात समावेश आहे. त्याच्या हजाराच्या जवळपास कॅसेट बाजारात आहेत. (साभार, आंबेडकरी कलावंत) (three lyricist complete one song for anand shinde, know story)

संबंधित बातम्या:

‘लिंबू मला मारीला गा, लिंबू मला मारीला…’ या गाण्यासह दीपशाम मंगळवेढेकरांची गाजलेली गाणी माहिती आहेत का?

आनंद शिंदेंचं ‘नवं नवं लुगडं…’ हे गाणं लंडनच्या हॉलमध्येही गाजलं; या गाण्याचे गीतकार कोण?; हा किस्सा वाचाच!

‘माथ्यावर हंडा हाय पान्याचा…’ गाणं गाजलं अन् लग्नही जुळलं; वाचा, ‘या’ गीतकाराच्या आयुष्यातील किस्सा!

(three lyricist complete one song for anand shinde, know story)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.