उमेश कामत-प्रिया बापट यांची कोरोनावर मात, लवकरच चित्रीकरणावर परतणार!

नुकताच उमेश- प्रियाचा क्वारंटाईन कालावधी संपला असून, ते कोरोनातून बरे झाले आहेत. यानंतर दोघांनी इन्स्टाग्रामवर लाईव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता.

उमेश कामत-प्रिया बापट यांची कोरोनावर मात, लवकरच चित्रीकरणावर परतणार!
'..आणि काय हवं ' या वेब सिरिजमधून प्रिया आणि उमेश यांची जोडी प्रेक्षकांच्या अजूनच पसंतीस उतरली. आता लवकरच '..आणि काय हवं 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 10:53 AM

मुंबई : काही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वातील क्यूट जोडी अर्थात अभिनेता उमेश कामत (Umesh kamat) आणि अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) यांना कोरोनाची लागण झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी याविषयीची माहिती चाहत्यांना दिली होती. दोघांची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आल्यानंतर दोघं घरातच क्वारंटाईन झाले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. या दरम्यान ते त्यांच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संपर्कात होते. आता त्यांनी चाहत्यांना कोरोनामुक्त झाल्याची गुडन्यूज दिली आहे (Umesh kamat and Priya Bapat successfully beaten corona starting new shooting soon).

नुकताच उमेश- प्रियाचा क्वारंटाईन कालावधी संपला असून, ते कोरोनातून बरे झाले आहेत. यानंतर दोघांनी इन्स्टाग्रामवर लाईव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी चाहत्यांची संवाद साधताना त्यांनी ही गुडन्यूज शेअर करत, प्रर्थानांसाठी आणि शुभेच्छांसाठी सगळ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

लवकरच कामावर परतणार!

या लाईव्ह सेशन दरम्यान चाहत्यांनी दोघांनाही विविध प्रश्न विचारले होते. एका चाहत्याने त्यांना ‘आणि काय हवं ?’ या वेबसीरीजचे तिसरे पर्व नेमके कधी येणार याविषयी विचारले होते. तेव्हा लवकरच या सीरीजचे उरलेले चित्रीकरण पूर्ण करणार असल्याचे उमेशने आणि प्रियाने सांगितले, असून लवकरच ही सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्याने म्हटले आहे. प्रिया-उमेशने यावेळी या विषाणूपासून बचाव करण्यासाठी त्यांनी कोणती काळजी घेतली, इतरांनीही कोणती काळजी घ्यायला हवी, याची देखील माहिती दोघांनी दिली. कोरोनातून बरे झाल्यानंतर लवकरच योग्य ती काळजी घेऊन दोघेही कामाला सुरुवात करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

पाहा उमेश आणि प्रियाचे लाईव्ह सेशन :

View this post on Instagram

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

(Umesh kamat and Priya Bapat successfully beaten corona starting new shooting soon)

कोरोनाची लागण झाल्यानंतर उमेश आणि प्रिया घरातच सेल्फ क्वारंटाईन झाले होते. याशिवाय त्यांनी त्यांच्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी देखील आपली कोरोना तपासणी करावी, असे आवाहन दोघांनी केले होते. उमेश कामत आणि प्रियाची ही बातमी कळताच सगळे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करू लागले होते. प्रिया आणि उमेशने अलीकडेच त्यांच्या लोकप्रिय वेब सीरीजच्या दुसर्‍या सीझनसाठी एकत्र शूटिंग सुरू केली होती. याशिवाय ते ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या मराठी नाटकासाठी टूर करण्यात व्यस्त होते. या जोडप्याने 2011 मध्ये लग्न गाठ बांधली होती आणि त्यांनी ‘टाईम प्लीज’ या मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘आणि काय हवं?…’ या वेब सीरीजच्या माध्यमातून उमेशने पहिल्यांदाच वेब विश्वात पदार्पण केले होते. तर, प्रिया बापटची ही दुसरी सीरीज होती. ‘आणि काय हवं?…’चे तिसरे पर्व लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

(Umesh kamat and Priya Bapat successfully beaten corona starting new shooting soon)

हेही वाचा :

Karan Johar | नेपोटीझम वाद टाळण्यासाठी करण जोहरची नवी खेळी, अभिनय नव्हे तर ‘या’ क्षेत्रात करणार सैफच्या लेकाला लाँच!

आमीर नाही, ‘तारे जमीं पर’चा खरा दिग्दर्शक मी होतो, अमोल गुप्तेंना 14 वर्षांनीही खुपते?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.